कोपरगाव शहर उद्धव ठाकरे शिवसेना; तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा,
Kopargaon City Uddhav Thackeray Shiv Sena; Taluka Level Elocution Competition,
यासाठी ४ हजार रुपयांचं पहिलं पारितोषिक असून एकूण ९ हजारांची बक्षिसं प्रदान केली जाणार आहेत.For this, there is a first prize of 4 thousand rupees and a total of 9 thousand prizes will be awarded.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu19Jan23 , 11.00 Am
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहर उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेत्यांच्याजाज्वल्य विचारांचा जागर करण्यासाठी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २३ जानेवारी २०२३ जयंतीनिमित्त तालुकास्तरीय विद्यार्थी व खुली अशी ही वक्तृत्व स्पर्धा आहे. यासाठी यासाठी दोन विभाग करण्यात आले असून एका विभागास दीड हजार रुपयांचं पहिलं पारितोषिक असून दुसऱ्या विभागासाठी अडीच हजाराचे पहिले पारितोषिक आहे. असे एकूण ९ हजारांची बक्षिसं व सन्मानचिन्ह प्रदान केली जाणार आहेत.
या स्पर्धेविषयी
– शनिवारी २१ जानेवारी सकाळी १०.३० वाजता व रविवारी, २२ जानेवारी २०२३ ला सकाळी १०.३० वाजता संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सप्तर्षी मळा येथील व्यासपीठावर होणार आहे.
विषय असे आहेत,
शनिवार दिनांक : २१ जानेवारी २०२३ सकाळी १०.३० वा. इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थी गट १) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मराठी अस्मिता,बाळासाहेबांचे चरित्र, बाळासाहेब एक प्रखर वक्ते, सुभाषचंद्र बोस एक विचारधारा, प्रथम पारितोषिक रु.१५०१/- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. ११०१/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. ७०१/- व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले आहे.
रविवार दिनांक : २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा.खुला गट १) शिवसेना व आझाद हिंदसेना, बेळगांव सिमावाद – बाळासाहेबांचे योगदान / संयुक्त महाराष्ट्र, दसरा मेळावा आणि बाळासाहेब,श्रीराम मंदिर व बाळासाहेब हे विषय ठेवण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक रु. २५०१/- व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु. २१०१/- व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक रु. १५०१/- व सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी – प्रत्येक स्पर्धकाला आपले विचार मानण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात येईल, शालेय विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र घेऊन येणे बंधनकारक आहे, स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील, प्रत्येक शाळेतून ३ विद्यार्थी सहभागी होऊ शकतात., स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार आयोजकाराकडे राहील, नाव नोंदणी शुक्रवार दिनांक १९ जानेवारी पर्यंत राहील, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे.