दिव्यांग (दृष्टिहीन) म्हणून त्याला हिनवले, पाच जणांविरुद्ध तालुका पोलिसात पहिला गुन्हा दाखल ..
He was taunted as Divyang (visually impaired), first case filed against five people in taluka police..
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed18Jan23 , 19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील आपेगाव येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीस दिव्यांग (दृष्टिहीन) म्हणून त्याला हिनवले, मारहाण शिवीगाळ,व दमदाटी केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग (दृष्टिहीन) व्यक्तीला हिणवले याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद पोपट खिलारी (३५) वर्षे धंदा. पिठाची गिरणी रा. आपेगांव,हे आई रतनबाई पोपट खिलारी व आजोबा ज्ञानदेव यशंवत खिलारी यांचे सह ग्रामपंचायतीचे गावठान जागेत राहवयास आहे. तीनशे स्क्वेअर फुटाच्या बांधलेल्या घरात एकत्र रहावयास आहेत. ११ जानेवारी रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शेजारी रोडच्या कडेला राहणारे साहेबराव बारकु खिलारी हे त्यांचे सरपण उचलण्यास आले असता त्यांना माझे आजोबा आमच्या उकिरड्यावर सरपण टाकू नको असे म्हणाले असता त्याचा राग येऊन त्यांना दमदाटी करू लागला तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांना बोलू नका असे म्हणालो तेव्हा तेथे रावसाहेब बारकू खिलारी हा तेथे आला व त्याने मला दिव्यांग (दृष्टीहीन) म्हणून हिणवले, आमचा आवाज ऐकून त्या ठिकाणी समाधान रावसाहेब खिलारी, अमोल रावसाहेब खिलारी, मिराबाई साहेबराव खिलारी असे आले व रावसाहेब खिलारी याने आमचा उकीरडा पांगवला व आजोबास हात धरुन खाली पाडले. मी सोडवण्यास गेलो असता माझ्या पाठीत बुक्या मारल्या व गालावर चापट मारली व वरील सर्व लोकांनी मला माझ्या आजोबास व आईस शिवीगाळ करुन तुम्हाला काय करायचे ते करा मी तुमच्याकडे पाहतो असे म्हणुन दमदाटी केली. त्यानंतर तेथे आमचे गावातील लोक जमा झाले तेव्हा ते सर्व जण निघुन गेले.
त्यानंतर शरद पोपट खिलारी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून रावसाहेब बारकू खिलारी यांच्या विरोधात दिव्यांग (दृष्टिहीन) म्हणून हिनवले असल्याची फिर्याद दिली सदर फिर्यादी वरून या प्रकरणी अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम, २०१६, भारतीय दंड संहिता १८६०,कलम ९२,३२३, ५०४, ५०६, १४३,१४७,१४९ अन्वये साहेबराव बारकु खिलारी,रावसाहेब बारकु खिलारी, समाधान रावसाहेब खिलारी, अमोल रावसाहेब खिलारी, मिराबाई साहेबराव खिलारी या पाच जणांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात या प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई सुरेश आव्हाड करीत आहेत.
Post Views:
626