गोदावरी नदीवर हायड्रॉलिक जंपिंग टाळण्यासाठी नवीन पुलाचे अंतर ३० मिटर ठेवा- संजय काळे 

गोदावरी नदीवर हायड्रॉलिक जंपिंग टाळण्यासाठी नवीन पुलाचे अंतर ३० मिटर ठेवा- संजय काळे 

To avoid hydraulic jumping over Godavari river, keep the distance of new bridge at 30 meters – Sanjay Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu19Jan23 , 14.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी ,गोदावरीनदीवरील  नव्या पुलाशेजारीच  समांतर असा  जुना दगडी पूल आहे या दोन्ही मधील अंतर  केवळ सात आठ मीटरचे आहे. नदीवर  कमी अंतरावर बांधलेल्या पुलामुळे  होणारे हायड्रोलिक जम्पिंग टाळण्यासाठी नवीन प्रस्तावित असलेल्या पुलाचे अंतर ३० मीटर ठेवावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते  संजय काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग  सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता नाशिक यांच्याकडे  एका निवेदनाद्वारे केली आहे.  

 ‘राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ जी हा कोपरगाव ते सावळीविहीर रस्ता आपल्या विभागाचे अखत्यारीत आहे. याच रस्त्यावरील गोदावरी नदीवरील १९५६ चा दगडी पूल पाडून त्या जागेवर नवीन पुल प्रस्तावित असल्याचे कळले.
               
सन २००७ मध्ये जुन्या, दगडी पुला शेजारी नवीन पुल बांधण्यात आलेला आहे. दोन्ही पुला मधील अंतर साधारण सात ते आठ मीटर असावे. आता २०२३ मध्ये जो नवीन पुल प्रस्तावित आहे. तो जुन्या पुलाच्या जागेवरच असले बाबतची चर्चा ऐकली. 
 

सध्याच्या नव्या आणि जुन्या दगडी पुलातील सात ते आठ मीटर अंतर

               

म्हणजे आत्ताचा २००७ व  व प्रस्तावित असलेला २०२३  नवापूल या  दोन्ही पुलांमध्ये सात ते आठ मीटरचे अंतर असणार. २ ऑगस्ट २०१६ रोजी रायगड जिल्हयातील, महाड तालुक्यातील बिरवाडी गावाजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील साखळी १२९/४००  वर सवित्री नदीवर ब्रिटीश कालीन दगडी पुल  महापुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. राष्ट्राची मोठी वित्त व जिवीत हाणी झाली. राष्ट्राने हळहळ व्यक्त केली.
               
ह्या पुलाच्या वाहून जाण्याच्या कारणांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिश एस. के. शाह यांची समिती नेमण्यात आली. समितीने आपला अहवाल राज्य सरकार कडे पाठवला. ” सदर अहवालाची प्रत मला माहिती अधिकारात  प्राप्त आहे. सदरच्या अहवालातील कलम ६५ मध्ये पुल वाहून जाण्याचे कारण दोन पुलातील अंतर फक्त सात ते आठ मीटर  असल्यामुळे पहिल्या पुलातून निघालेल्या पाण्या मुळे दुसऱ्या पुलावर हायड्रोलिक जम्पिंग मुळे आपटले. सावित्री नदीवरील पुलाला ह्या हायड्रोलिक जम्पिंग चा  मोठा धोका पोहचला असावा असे साक्षीदार क्र . २०  श्री. डॉ. ज्योतीप्रकाश यांनी म्हटल्याचे नमुद केले.
             
ह्याच अहवालात कलम ६५ चे शेवटी निवृत्त न्यायाधिश शहा यांनी नमुद केले की, भविष्यात हायड्रोलिक जम्पिंग  पुनरावृत्ती होऊ नये यासाठी  राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी  भविष्यातील धोका टाळण्यासाठी सावित्री नदीवर नव्या व जुन्या पुलात ३०  मीटर अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  मग असाच निर्णय कोपरगावच्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी   गोदावरी नदी येथे बांधण्यात येणाऱ्या नव्या व जुन्या पुलात  ३० मीटरचे अंतर ठेवावे  असे विनम्र आवाहन संजय काळे यांनी  केले आहे
भविष्यात पुलांच्या स्ट्रक्चरल डिझाइन मुळे, आपल्या विभागाच्या कंजूसपणा मुळे, कुठलाही पुल रस्ता वाहून जाणार नाही याच्या खबरदारी साठी कोपरगाव येथील गोदावरी नदीवरील  प्रस्तावित पुल सन २००७ चे पुलापासून तीस मीटरवर बांधण्याची कृपा करावी. असे असे शेवटी निवेदनात संजय काळे यांनी म्हटले  आहे

चौकट

 उलट टपाली मला आपण घेत असलेल्या निर्णयाचे बाबत कळवावे. अन्यथा राज्यातील पुलांचे बाबतची माझी प्रलंबित जनहितार्थ याचिका जी औरंगाबाद खंडपीठात आहे, ज्यामध्ये सावित्री नदीच्या पुलाचा अहवाल मी पुर्वीच दाखल केलेला आहे.त्या याचिकेत दिशा दिवाणी अर्ज, केले जाईल. – संजय काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page