ठेकेदाराची अनामत जप्त केली; म्हणून आंदोलन थांबणार नाही – ॲड. नितीन पोळ
Contractor’s deposit forfeited; So the agitation will not stop – Adv. Nitin Pol
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu19Jan23 , 15.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह दुरुस्तीच्या काम दीड वर्षात केले नाही या कारणास्तव ठेका रद्द करून ठेकेदाराची अनामत जप्त केली म्हणून आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन होणारच असा ठाम निर्धार लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
लोकस्वराज आंदोलनाच्या वतीने २६ जानेवारीचा अल्टिमेटम देण्यात आल्याने धाबे दणाणलेल्या नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी घाई घाईने बुधवारी १८ जानेवारीला आंदोलकांना पत्र दिले या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सदर ठेकेदाराला अंतिम नोटीस देण्यात आली असून त्यात काम सुरू न झाल्यास कामाचा कार्यादेश रद्द करण्यात येऊन कामासाठी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येईल व नवीन जिल्हा दर सूची करून नवीन निविदा प्रक्रिया करण्यात येईल असे पत्र दिले होते.
या पत्रावर प्रतिक्रिया देताना ॲड.नितीन पोळ म्हणाले, असे असले तरी सदर ठेकेदाराने आता पर्यंत किती काम केले? त्यावर ठेकेदाराला किती पेमेंट दिले? ठेकेदाराने आता पर्यंत सदर नाट्य गृहाचे जुनी फरशी व समान काढले असून त्याची कुठे विल्हेवाट लावली ? दोन वर्षांपूर्वी त्या वेळच्या जिल्हा दर सूची प्रशासकीय मान्यता या साठी झालेला खर्च व पुन्हा एकदा नवीन कामा करिता व नवीन निविदा प्रक्रिये साठी वेळ व नगर पालिकेला होणाऱ्या आर्थिक भुर्दंड याची जबाबदारी कोणावर टाकणार ? या प्रश्नांची समाधान कारक उत्तरे मिळाली नाही तर प्रजासत्ताक दिनी आंदोलन होणारच आहे .याचा पुनरुच्चार ॲड.नितीन पोळ,संतोष गंगवाल, प्रवीण शिंदे, तुषार विध्वंस,निसार शेख, योगेश गंगवाल आदींनी केला आहे
चौकट
तुला ना मला, घाल कुत्र्याला’ या वाक्याचा शब्दशः प्रत्यय कोपरगावच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाकडे पाहिल्यावर आता नक्कीच येणार आहे…
काम परवडत नव्हते तर ठेका का घेतला? शुभारंभाचे नारळ का फुटले ? ठेका परवडत नव्हता यासाठी मग तब्बल दीड वर्ष वाट का पाहिली ? तरीही मग पाडकाम का झाले?, पालिकेच्या संपत्तीच्या झालेल्या नुकसान भरपाईला जबाबदार कोण?…
केवळ ठेका रद्द केला, अनामत जप्त केली म्हणून हात झटकून चालणार नाही.या दयनीय अवस्थेला मागील दिड वर्षांतील सर्वच जबाबदार आहेत व त्यांच्याकडूनच आता नुकसानीची वसुली गरजेची झाली आहे… असे प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत
Post Views:
272