विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून  विकास करणारी संजीवनी ही एकमेव शाळा  – सौ. सुचेता कुलकर्णी                                               

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून  विकास करणारी संजीवनी ही एकमेव शाळा  – सौ. सुचेता कुलकर्णी

Sanjeevani is the only school that develops by considering the intelligence of the students – Mrs. Sucheta

संजीवनी अकॅडमीच्या टाॅडलर्सचे स्नेहसम्मेलन Sanjeevani Academy Toddlers’ Reunion

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 16.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव:  संजीवनी अकॅडमीच्या टाॅडलर्सच्या   बाल कलाकारांनी सादर केलेले नृत्ये, गीते, नाटिका, इत्यादी मंत्रमुग्ध करणारे आहेत. प्रत्येक क्षेत्रात विध्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय पातळीवर मिळविलेले बक्षिसे यातून स्कूलच्या दर्जा व गुणवत्ता बघता  विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून शाळा  व पालक समन्वयातून विद्यार्थीचा अनेक प्रकारे विकास करणारी संजीवनी ही परीसरातील एकमेव शाळा  असल्याचे गौरवउद्गार नाशिक  येथिल कनेक्ट अकॅडमीच्या प्राचार्या व मानसशास्त्र  समुपदेशक सौ. सुचेता कुलकर्णी यांनी यक्षगणा’ या संकल्पनेवर आधारीत स्नेहसंमेलन प्रसंगी केले.

सौ. कुलकर्णी म्हणाल्या की येथिल शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये  ठासुन भरविलेला आत्मविश्वास  आणि घेतलेल्या कष्टाचे  हे प्रतिबिंब आहे. यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या सर्वागीण विकासाठी निवडलेली शाळा  योग्य आहे, येथिल विध्यार्थ्यांच्या  सर्वागीण प्रगतीवर समाधान व्यक्त करून व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. 
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे, योगाचार्य  उत्तमभाई शहा, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तीन ते चार वर्षाच्या  चिमुकल्यांनी अस्खलीत इंग्रजी मधुन निवेदन केले,  उत्तम संवाद फेकविविध परिकथा, उंचावर बांधलेल्या कपड्याच्या  सहाय्याने सादर केलेली अंग मेहनतीची प्रात्यक्षिके, चार वर्षांच्या  दोन मुलांनी योगाचे सादर केलेले १६ प्रकार, उत्तम रंगमंच, उत्कृष्ट  ध्वनी व्यवस्था,  संगीत व लायटींग आणि  प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांची मिळणारी भरभरून दाद, इत्यादी बाबी या सम्मेलनाची ठळक वैशिष्ठे ठरली.
संचालिका डाॅ. मनाली कोल्हे म्हणाल्या की कोरोना काळातील  अनेक बाबींची उणिव भरून काढण्यासाठी पालकांच्या सहकार्याने स्कूल विशेष  प्रयत्न करीत आहे. . वर्षभरात मुलांनी कोडींग, क्रीडा, संगीत, नृत्य, ऑलिम्पियाड  स्पर्धांमधिल १०० पदकांची कमाई करून राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  स्तरावर संजीवनीचे नाव उज्वल केले आहे, हे सर्व स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या मार्गदर्शक  तत्वांच्या  वाटेवर प्रवास करीत आहोत.
योगाचार्य शहा यांनी मुलांचे कौतुक करून जीवनात योगाचे महत्व सांगीतले.
 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकिय अधिकारी  प्रकाश  जाधव, प्राचार्या सौ. शैला  झुंजारराव, हेड मिस्ट्रेस सौ. रेखा साळुंके, सेंटर हेड कोमल भल्ला, आदींनी विशेष  परीश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page