महाराष्ट्र भूषण जागतिक स्वच्छतादूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अभिनंदन- विवेक कोल्हे
Maharashtra Bhushan Global Sanitation Ambassador Dr. Congratulations to Appasaheb Dharmadhikari – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 16.50 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : नानासाहेब धर्माधिकारी यांचा वसा चालविणा-या रायगड रेवदंडा येथील अध्यात्मीक गुरु व जागतिक स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विवेक कोल्हे म्हणाले की, जगात पर्यावरण संतुलनाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी पर्यावरण रक्षणासह स्वच्छतेचे मोठे काम केले तोच वसा चिरंजीव डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी उचलत दासबोध, श्री सदगुरु चरित्रातून तमाम समाजबांधवांना निरुपणातून अध्यात्म संस्कारासह स्वच्छतेची शिकवण दिली.
व्यसनमुक्ती, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान,विहारीतील गाळ आदि अभियान त्यांनी लोकाभिमुख बनवली. वडील डॉ. नानासाहेब आणि मूलगा डॉ. दत्तात्रेय ऊर्फ आप्पासाहेब या दोघांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार मिळाले हा राज्याचा सर्वोच्च सन्मान व सर्वसामान्य भक्तांचा मोठा ठेवा आहे.
गेली आठ दशके स्वच्छतेचे काम अव्यहतपणे सुरू आहे. गणेशोत्सव, नवरात्र उत्सवातून निर्माल्य गोळा करून त्यापासून खत निर्मीतीही त्यांनी केली आहे. लोकशिक्षणालाही महत्व देत अंधश्रद्धा, जुन्या चालीरिती यांचा समूळ नायनाट केला, त्यांचे हे काम आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे असेही ते शेवटी म्हणाले.
Post Views:
153