गोदावरी कालव्यांना रब्बीचे आवर्तन १५ फेब्रुवारी पर्यंत सोडा- स्नेहलता कोल्हे 

गोदावरी कालव्यांना रब्बीचे आवर्तन १५ फेब्रुवारी पर्यंत सोडा- स्नेहलता कोल्हे 

Leave Godavari canals with Rabi circulation till February 15- Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 17.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव गोदावरी डावा उजव्या कालव्यास एक मार्च रोजी सोडण्यात येणारे आवर्तन शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाने १५ फेब्रुवारीपर्यंत सोडावे अशी मागणी भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे  यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. 

राज्याचे महसूलमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे  यांच्या अध्यक्षतेखाली २२ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधान भवनात गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत  ठरल्याप्रमाणे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांना एक रब्बी व तीन उन्हाळी आवर्तन (रोटेशन) देण्यात येणार आहे. गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन ठरल्याप्रमाणे येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. जर पाटबंधारे खात्याने ठरल्याप्रमाणे १ मार्चला आवर्तन सोडले तर ४ मार्चपर्यंत पाणी खालपर्यंत येईल आणि हे आवर्तन पाच दिवस पिण्याच्या पाण्यासाठी जाईल. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही
शेतातील उभ्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे, या पिकांना पाणी वेळीच पाणी न मिळाल्यास पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांचे आवर्तन नियोजित  १ मार्चच्या आधी १५ फेब्रुवारीपर्यंत आवर्तन लवकर सोडण्याची मागणी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल  पाटबंधारे विभागाने घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
 
चौकट
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या,. हे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय कालवे बंद करू नयेत. टेल टू हेड सर्वच लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे. पाटबंधारे विभागाने  पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे. नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही सौ.कोल्हे यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page