कोपरगाव नगरपालिकेने ढोल ताशा वाजवीत वसुलीचे फुंकले रणसिंग !
Kopargaon municipality beat the drum and blew Ransingh’s recovery!
पाणी पट्टी, घरपट्टी गाळे भाडे न भरल्यास मालमत्ता सील; थकबाकी १० कोटी! Sealing of property if rent is not paid; Outstanding 10 crores!
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir10 Feb23 , 18.50 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : नगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता, पाणी व गाळे थकीत कर मागणी १३ कोटी ९५ लाख ९१ हजार ८७३ इतकी आहे. पाणी पट्टी, घरपट्टी व गाळे भाडे न भरल्यास मालमत्ता सील; थकबाकीदार विरुद्ध कोपरगाव नगरपालिकेने मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशा वाजवीत वसुलीचे फुंकले रणसिंग !
ढोल-ताशांचा गजर करीत अभिनव उपक्रम हाती घेतल्याने थकबाकीदारांचे दणाणले आहे .
नगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता, पाणी व गाळे थकीत कर मागणी १३ कोटी ९५ लाख ९१ हजार ८७३ इतकी आहे.पैकी ३ कोटी ७५ लाख ८७ हजार २९५ इतकी वसुली झाली आहे. १० कोटी १९ लाख,१७ हजार ०९५ इतकी थकबाकी आहे. थकबाकी कराच्या केवळ २८ टक्के वसुली झाली असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
शुक्रवारी १० रोजी शहरातून थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी करदात्यांच्या जनजागृती साठी ढोल-ताशांचा गजर करीत शहरातून फेरीचे आयोजन करण्यात आले होते.यात कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. अत्यंत नाविन्यपूर्ण अशा कल्पनेतून या फेरीचे आयोजन केले गेले.फेरी मध्ये ढोल ताशा आणि कर वसुली बाबत जनजागृती फलकांचा वापर केला गेला .या फेरीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना वेळेत कर भरणा करणे बाबत सूचित करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासात आणि शहराच्या सुख सुविधा वाढविणे कामी जमा होणाऱ्या संकलित कराला महत्वाचे स्थान आहे.संकलित कराच्या आधारेच शहर विकासाचे नियोजन करणे शक्य होते.आणि जर संकलित कर जमा झाला नाही तर नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुखसुविधा देण्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला बंधने येतात. त्यामुळे शहराचा विकास होणे कामी आणि नागरिकांना दर्जेदार मुलभूत सुविधा पुरविता याव्यात यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कडील देय्य कर रक्कम वेळेत जमा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा.श्री शांताराम गोसावी साहेब यांनी केले.
याबाबत बोलताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, आज आम्ही ढोल ताशा वाजत गाजत वसुलीचे शिंग फुंकले आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदार याच्या नावांची यादी दैनिक वर्तमानपत्रात तसेच शहरातील मुख्यचौकात फलकावर जाहीर रित्या प्रसिध्द करणे,थकबाकीदार यांचे घरासमोर ढोल वाजविणे, थकबाकीदारांच्या नावाची लाऊडस्पिकर वर अनौस्मेनट करणे, थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करणे,जप्त केलेली मालमत्ता विक्री करणे,त्याच प्रमाणे थकबाकीदार यांच्या विरुद्ध न्यायालयात दावा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो असे श्री गोसावी यांनी सांगितले
पालिकेने ढोल-ताशांचा गजर करीत अभिनव उपक्रम हाती घेतला असून याचा किती परिणाम कर दात्या नागरिकांवर होतो हे पाहणे गरजेचे आहे.
Post Views:
251