पालिकेच्या बॅनरबाजीचे तीव्र पडसाद; राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली; बॅनरला काळे फासले

पालिकेच्या बॅनरबाजीचे तीव्र पडसाद; राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली; बॅनरला काळे फासले

    Harsh repercussions of the municipality’s banner campaign; Nationalists took to the streets; The banner was blackened

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun12 Feb23 , 18.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेने  वसुलीसाठी शहरातील चौका चौकात थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावले होते. पालिकेच्या या बॅनरबाजीचे तीव्र पडसाद उमटले; याचा तीव्र शब्दात निषेध करीत  रस्त्यावर उतरलेल्या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी   शिडीवर चढून बॅनरला काळे फासले व आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या,

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले कोपरगाव शहरातील नागरिकांना पालिकेपासून मिळणाऱ्या हक्काच्या मूलभूत सुविधा आठ दिवसाने मिळणारे पाणी स्वच्छता आरोग्य या गोष्टींची वाणवा आहे. कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडून काही काळ कर थकबाकीसाठी  सूट मिळाली असली तरी कोरोना संकट काळाने विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला वेळ लागणार आहे. असे असतानाही कर्ज वसुलीसाठी पालिकेकडून बॅनर बाजी करून थकबाकीदारांवर  दबाव आणला जात आहे. करवसुलीसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. याबाबत थकबाकी धारकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. दुसरीकडे  मोठी थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी  पालिकेमध्ये जाऊन आपल्या थकबाकीचे हप्ते पाडून थकबाकी भरली पाहिजे  असेही ते म्हणाले,  
  यावेळी  मंदार पहाडे, सुनील  शिलेदार, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब रुईकर, रोहित खडांगळे, महेश उदावंत, सागर लकारे, धनंजय कहार,संतोष शेजवळ, गोरख कानडे, इम्तियाज आत्तार,  नवाज कुरेशी, विकी जोशी, प्रकाश दुशिंग, आकाश डागा, यांच्यासह   राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते

Leave a Reply

You cannot copy content of this page