कोपरगाव नगरपालिका कर वसुलीसाठी आक्रमक; शहरात थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर झळकले 

कोपरगाव नगरपालिका कर वसुलीसाठी आक्रमक; शहरात थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर झळकले 

Kopargaon Municipality Aggressive for Tax Collection; Banners with the names of defaulters were seen in the city

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun12 Feb23 , 18.00 Pm By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : नगर परिषदेमार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी आक्रमक झालेल्या कोपरगाव नगरपालिकेने ढोल बजाव करत विशेष वसुली मोहिम सुरू केली.पाठोपाठ शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावांचे बॅनर झळकविल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नगर परिषदेकडून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासह थकबाकीच्या १० कोटी मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुल दुकानभाडे, मोबाईल टॉवर जागा भाडे आदींच्या वसुलीसाठी झोन निहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहेत.  या वसुली मोहिमेसाठी शुक्रवारी (१०) रोजी पालिकेने ढोल बजाव करीत रणशिंग फुंकले होते, 
ज्यामध्ये मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करणे नळ जोडणी खंडीत करणे , नगर परिषद व्यापारी संकुलनातील दुकानास सिल ठोकने थकबाकीदारांची नावे वृत्त पत्रात प्रसिध्द करणे तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांची नावे बॅनरद्वारे प्रसिध्द केली जाणार आहेत. असा इशारा पालिकेतर्फे दोन दिवसापूर्वी देण्यात आला होता.
 पाठोपाठ  शनिवारी (११) रोजी दुसऱ्या दिवशी शहरातील सावरकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आई तुळजाभवानी मंदिर. बाजारतळ या ठिकाणी  थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर नगरपालिकेने लावले आहेत. जे नागरिक व व्यापारी या मोहिमेत नगर पालिकेचा कर भरणार नाहीत अशा विरुध्द जप्तीची मोहिम राबविण्यात येणार आहे..त्यामुळे नागरिकांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page