भिंत पाडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Clashes between two groups over demolition of wall; A case has been registered against seven people
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun12 Feb23 , 18.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील अहिंसा स्तंभ चौकातील गुरुद्वारा रोडवर हॉटेलची भिंत पाडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. शनिवारी (११) रोजी दुपारी एक वाजेच्या सुभारास घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील दोन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर तक्रारीवरून शहर पोलिसात सात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहरात अहिंसास्तंभ चौक या ठिकाणी जुनी बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी जुनी बिल्डिंग पडण्याचे काम अंतिम टप्प्यात असतांना त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या रसरंग हॉटेलची भिंत पाडल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विघ्नेश्वर चौक व गुरुद्वारा रोडवर काहीकाळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
दोन्ही गटांनी थेट कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी एका गटाच्या पहिल्या फिर्यादीत प्रतिक संजय साबळे रा. खडकी ता. कोपरगाव यांनी म्हटले आहे की , आरोपी प्रतिक सुभाष कदम , तुषार भाउसाहेब गायकवाड व त्यांचे सोबत इतर पाच ते सहाजन नाव,गांव माहीती नाही. यांनी फिर्यादी यांचे हॉटेल रंसरंगचे भिंत पाडण्याचे कारणावरुन फिर्यादी यांचेशी वाद घालुन फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता, आरोपी मजकुर यांनी फिर्यादीचे हॉटेल रसरंगचे काउटर फोडुन नुकसान करुन फिर्यादीस लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने डावे हातावर, पायावर मारहान करुन गंभीर जखमी करुन शिवीगाळ केली आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम३२४,१४३,१४७,१४८,१४९,३२३, ४४१, ४२७,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या फिर्यादीत तुषार भाउसाहेब गायकवाड रा. अनकुटे ता.येवला यांनी म्हंटले आहे की, आम्ही विघ्नेश्वर चौकातील अनकुटे बिल्डींग येथे बिल्डींग पाडलेल्या ठिकाणी राहीलेले काम करीत असताना त्या ठिकाणी यातील आरोपी प्रतिक संजय साबळे, संजय साबळे, अमितेश साबळे, परीणीत साबळे, रामदास निवृत्ती अभंग व इतर तीन ते चारजन त्यांचे नाव गाव माहीती नाही यांनी येवुन या ठिकाणी कोणतेही शॉपींग सेटर होणार नाही. तुम्ही आमचे रसरंग हॉटेलजवळ आलेच कसे असे म्हणुन फिर्यादी यांचेशी वाद घातला तेव्हा फिर्यादी हे आरोपीतास समजावुन सांगत असतांना, आरोपी क्र.१ ते ३ यांनी त्यांचे हातातील लोखंडी रॉडने साक्षीदार प्रतिक कदम यांचे पोटावर डावे बाजुला, हातावर, पायावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले तेव्हा फिर्यादी हे सोडवा सोडव करत असतांना, आरोपी मजकुर क्र. ४, ५ व इतर आरोपी नाव,गाव माहीती नाही यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहान केली व शिवीगाळ करुन तुम्ही येथुन निघुन जा नाहीतर तुम्हांला आम्ही जिवंत सोडणार नाही असे धमकी दिली आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध भादवि कलम ३२४,१४३,१४७, १४८, १४९,३२३,, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सब इन्स्पेक्टर संजय पवार हे करीत आहे .
दरम्यान भर दुपारी झालेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Post Views:
187