दरोड्याचा डाव फसला; समृद्धीच्या खाजगी संपर्क अधिकारी दरोड्याखोरांकडून  अपहरण करून मारहाण

दरोड्याचा डाव फसला; समृद्धीच्या खाजगी संपर्क अधिकारी दरोड्याखोरांकडून  अपहरण करून मारहाण

The robbery plan failed; Samriddhi’s private liaison officer kidnapped and beaten up by robbers

तीन लाखाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक दोन दिवसाची पोलीस कोठडीTwo accused were arrested with three lakh worth of valuables and sent to police custody for two days

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 Feb23 , 19.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड शिवारामध्ये समृद्धी महामार्गाचे संपर्क अधिकारी प्रवीण भरत निंबाळकर हे सोमवारी (१३) रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना जनरेटर  खोलत  असताना काहीजण आढळून आले त्यांना हटकले असता आमचा दरोड्याचा डाव फसला असे म्हणत त्यांनी संपर्क अधिकारी यांना तवेरा गाडीत टाकून त्यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी  पाच जणाविरुद्ध  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

 फिर्यादी प्रवीण भरत निंबाळकर (३७) , समृद्धी महामार्ग ठेकेदार कंपनीचे संपर्क अधिकारी खाजगी नोकरी, रा निंबळक, ता. फलटण जि. सातारा हल्ली मुक्काम कंपनी कॅम्प, झगडे फाटा, चांदेकसारे ता. कोपरगाव
हे सोमवारी (१३) रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना तवेरा गाडी न. एम. एच. १७ क्यू.१३४१  ही  तवेरा गाडी परत समृध्दी रोडवर आली.  जनरेटर  खोलत  असताना काहीजण आढळून आले त्यांना विचारपूस करण्यासाठी गेले असता असता आरोपीचे  अन्सार आलम शेख रा इस्लामवाडी,चांदेकसारे ता कोपरगांव, अमोल भाऊसाहेब होन झगडेफाटा ता कोपरगांव, सोनू शिंदे पूर्ण नाव माहीत नाही, संदीप दहे पूर्ण नाव माहीत नाही, शेंडी पूर्ण नाव माहीत नाही तिघे रा.डाऊच बुद्रुक ता. कोपरगांव,यातील आरोपी मजकूर यांनी फिर्यादीस उचलून तवेरा गाडीत टाकून अपहरण केले.तसेच फिर्यादीस गाडीत पाठीमागे बसलेल्या तीन आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली व आरोपी मजकूर हे फिर्यादीस म्हणाले की, आज तुम्ही आमचा दरोड्याचा प्लॅन फेल केला. तसेच  जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रवीण निंबाळकर यांच्या गाडीला जोराची धडक दिली. व तवेरा गाडीत एक धारदार चाकू, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी पाइप, एक कटवनी, एक रस्सी असे दरोडा टाकण्याची हत्यारे मिळून आली. 
तीन लाखाच्या तवेरा गाडी सहा हजार रुपयांचे दोन मोबाईल,  एक धारदार चाकू, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी पाईप, एक लोखंडी कटवणी. रस्सी ई. मुद्देमालासह अन्सार आलम शेख, व अमोल भाऊसाहेब होन या दोघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर यातील आरोपी सोनू शिंदे , संदीप दहे, शेंडी पूर्ण नाव माहीत नाही तिघेजण  पळून गेले आहे. 
प्रवीण निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि.नं.८७/२०२३  भा द वी कलम ३९९, ३०७, ३६४,३२३,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.
  

Leave a Reply

You cannot copy content of this page