कोपरगाव बिबट्याने हल्ला करून कालवड फस्त केली
Kopargaon leopard attacked and destroyed Kalavad
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 Feb23 , 19.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील खडकी शिवारातील जुन्या टाकळी रोड लगत असलेल्या पांढरे वस्ती येथे हल्ला करत एका बिबट्याने कालवड फस्त केली. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
येथील खडकी शिवारात जुन्या टाकळी रोड लगत पांढरे वस्ती असून येथे अंबादास माधवराव आढाव यांच्या मालकीच्या तीन गाई व एक कालवड तारेच्या कुंपणाच्या आत दावणीला बांधलेले असताना सोमवारी (ता.१३) रात्री उशिरा बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवला. आठ महिन्याच्या गीर कालवडीला तारेच्या कंपाउंड बाहेर ओढत नाहीत फस्त केले. सकाळी श्री. आढाव शेतात दूध काढण्यासाठी गेल्यावर ही घटना लक्षात आली. वन विभागास माहिती दिल्यावर वन कर्मचारी देवराम जाधव यांनी मृत कालवडीचा पंचनामा केला. वन विभागाने पिंजरा लावण्याची व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे.काही दिवसांपूर्वी टाकळी भागात का बिबट्याने सचिन देवकर यांच्या वस्तीवरील जर्मन शेफर्ड कुत्र्यावरही हल्ला केला होता मात्र यावेळी ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून बिबट्याला पळवून लावले होते कोपरगाव तालुका परिसरात आत्ता मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी नागरी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर सुरू झाला आहेत
Post Views:
249