कोपरगाव समृद्धी महामार्ग: भरधाव कार संरक्षण कठड्याला धडकली; चालक बचावला, कारचा चक्काचूर
Kopargaon Samriddhi Highway: Speeding car hits guardrail; Driver escaped, car wrecked
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 Feb23 , 19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात अपघाताची एक भयंकर घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. या घटनेत गाडीत एकटेच असलेले चालक मात्र नशिबाने बचावले आहेत. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर कोकमठाण शिवारात सोमवारी (१३) रोजी दुपारी ही घटना घडली . कार चालक बाळासाहेब धरम हे एकटेच एम एच १७ सीएम ४०७४ या कारणे औरंगाबाद कडून शिर्डी कडे येत असताना कार वरील ताबा सुटल्याने भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्याला धडकली. हा अपघात इतका जोराचा होता की यात संरक्षण करण्याचा बराच भाग तुटला परंतु सुदैवाने कार कठड्याला अडकून राहिल्यामुळे चालक बचावला असं चालक बाळासाहेब धरम हे बचावले असून जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे महामार्ग पोलिसांना घटने अपघाताची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून कारचालक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला काढली आहे
Post Views:
331





