कोपरगाव शहर व तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोपरगाव शहर व तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Shiv Jayanti was celebrated with great enthusiasm in Kopargaon city and taluka

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun19 Feb23 ,20.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  ३९३  वी जयंती कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी व मिरवणुकीने साजरी.

   कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने आज रविवारी (१९)  रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्यासह २१ जोडप्यांच्या हस्ते विधिवत दुग्धाअभिषेक महापूजा करण्यात आली असून यावेळी महाआरती करून मानवंदना देण्यात आली. 
पालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास सुंदर अशी फुलांची सजावट स्मारकामागे खळखळत्या पाण्याचा वाहणारा पाण्याचा धबधबा  आकर्षक विद्युत रोषणाई स्वच्छ असा परिसर भगव्या रंगाने व शिवछत्रपतीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती ! बिपिनदादा कोल्हे
 शिवरायांचे विचारांचे अनुकरण गुण आपल्या अंगी बाणवण्याचा निश्चय केल्यास समाजातील अनेक चुकीच्या घटनांना आळा बसेल आणि सर्व समाज सुख, समाधान व आनंदाने जीवन जगू शकेल. त्यामुळे समाजाप्रती  कार्य करताना   शिवरायांसारखे आदर्श जीवन जगणे, ही आजच्या काळाची आवश्यकता असून खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय. असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी शहरातील छत्रपती शिवराय महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करताना व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष, कल्याणकारी राजे  – आ.आशुतोष काळे शुर,बुद्धिमान,मुत्सद्दी,लोककल्याणकारी राजे अशी जगभर ख्याती असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत, तर ते संपूर्ण देशाला, जगाला आदर्शव्रत आणि प्रेरणास्थानी असून ते संपूर्ण जगाचे मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवरायांना मॅनेजमेंट गुरू म्हणून जगात गौरवले जाते. पाश्चिमात्य देश त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहेत ही गोष्ट संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानासपद असून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष, कल्याणकारी राजे होते असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य दिव्य अशी  मोटर सायकल रॅली काढण्यात आली यावेळी महिलांनी नऊवारी साड्या आणि भगवे फेटे परिधान केले होते  ही रॅली मोठी आकर्षक दिसत होती. जय भवानी-जय शिवाजीच्या जय जयकाराने राजमाता जिजाऊ उद्यानापासून सुरू झालेल्या या रॅलीत आ.आशुतोष काळे यांनी देखील या  सहभागी होवून शिवभक्तांचा उत्साह वाढविला. या रॅलीचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ झाला
प्रगत शिवाजी रोड मित्र मंडळाच्या वतीने शिवरायांची  भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येने  शिवप्रेमी शिवभक्त हजर होते
शिवजागर प्रतिष्ठानच्या वतीने संत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक व आरती करण्यात आली यावेळी जय शिवराय जय भवानी  जय जिजाऊ या घोषणाने परिसर दुमदुमून गेला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  ब्लड बँक यांच्या सहकार्याने सलग ४ थे वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. शिबिरात शहरातील विविध भागातील ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 शहरातील गजानन नगर भागात जय हिंद विचार मंचावतीने महिला अध्यक्ष सोनल चोरगे यांनी एक देश एक झेंडा हा उपक्रम राबवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला सात महिलांनी औक्षण करत तिरंगा झेंडा हाती घेत  राष्ट्रीय एकात्मतेचा संजय संदेश देणारी शिवजयंती साजरी केली. तालुक्यातील कुंभारी येथे राजेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामस्थांना बरोबर घेऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. तालुक्यातील चांदेकसारे येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
कोपरगाव शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सायंकाळी पालखी मिरवणुका व सहवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आल्या यावेळी हजारो महिला व नागरिक शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave a Reply

You cannot copy content of this page