महाशिवरात्रीला कोपरगाव येथील सोमेश्वर महादेवाची जिल्हाधिकारी यांनी केली पूजा 

महाशिवरात्रीला कोपरगाव येथील सोमेश्वर महादेवाची जिल्हाधिकारी यांनी केली पूजा

Someshwar Mahadev of Kopargaon was worshiped by Collector on Mahashivratri

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat18 Feb23 ,20.00 Pm
By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : महाशिवरात्रीनिमित्त कोपरगाव शहरातील देवास ज्युनिअर संस्थांचे श्रीमंत महामहीम पवार सरकार यांच्या ऐतिहासिक पुरातन सोमेश्वर महादेवाची अभिषेक पूजा व आरती जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी  सिध्दराम सालीमठ यांनी केली यावेळी त्यांचे समवेत अप्पर जिल्ह्यधिकारी सुहास मापारी व सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील हे होते अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत घोडके यांनी दिली .

       
 यावेळी व्यवस्थापन समितीचे जयंत विसपुते, चंद्रकांत कौले,मनोज कपोते, रजनी ठोंबरे,कविता साळुंखे,योगिता माळवे,, पौरोहित्य प्रविणशास्री मुळे, गोपिनाथशास्री जोशी,प्रशांत स्वामी जंगम,रमेश जंगम,जैन तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीचे संतोष गंगवाल, नंदू शेंडे(गुरव), गोरक्षण भजनी महिला मंडळाच्या सदस्या यांचे सह सोमेश्वर महादेव भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       
जिल्ह्यधिकारी सिध्दराम सालीमठ व अप्पर जिल्ह्यधिकारी सुहास मापारी यांचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पारंपरिक टोपी, उपरणे, श्रीफळ व प्रसाद देउन सन्मान करण्यात आला. 
        सोमेश्वर महादेव देवस्थानचे अभिप्राय नोंदवहीमध्ये,”महाशिवरात्रि निमित्ताने हा योग आला.पुरातन मंदिरात दर्शन हा योग विराळाच. मन प्रसन्न करणा-या वास्तूत भगवान सोमेश्वर दर्शनाने मनस्वी समाधान वाटले. भगवान सोमेश्वर सर्व भक्तांना सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवो.” असा अभिप्राय नोंदविला. 
         

Leave a Reply

You cannot copy content of this page