रामा. ७५२ जी  दुरुस्तीत हलगर्जीपणा, काम निकृष्ट होत असल्याचा काळेंचा आरोप

रामा. ७५२ जी  दुरुस्तीत हलगर्जीपणा, काम निकृष्ट होत असल्याचा काळेंचा आरोप

Rama. 752G Laxity in amendment, Kalen alleges deterioration of work

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon20 Feb23 ,20.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी कोपरगाव हद्दीतील रस्ते दुरुस्तीत हलगर्जीपणा होत असून काम निकृष्ट होत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला असून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक यांनी  याची दखल न घेतल्यास निषेधार्थ महामार्गावर ढोल वाजविणार  असा इशारा काळे यांनी दिला आहे 

कोपरगाव शहर हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र ७५२ जी चे काम येवला  नाका ते गोदावरी नदी डांबरीकरण केले जात आहे. हे काम अतिशय निकृष्ट पध्दतीने चालू आहे.
           कोपरगाव शहर हद्दीतील रस्ता २००६ चे कामात देखील मिसींग लिंक असल्यामुळे त्या वेळेस मजबूतीकरणाचे काम न करता सरळ डांबरीकरण केले. त्याचा परिपाक म्हणजे गोदावरी पुलापासून ते येवला नाक्या पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
          पुराव्या साठी आजवर झालेल्या खड्डे बुजवण्याचे कामांचे मोजमाप रजिस्टरची तपासणी करावी. सध्या काम करीत असलेल्या ठेकेदाराने खराब पॅच चे मजबूतीकरण न करता सरळ डांबरीकरण चा पहिला निकृष्ट स्तर मारला व आता दुसरा व अंतीम स्तर मारत आहे. हे म्हणजे  ठिगळे  असलेल्या शर्टावर थेट रेमंडचा कोट चढविण्यासारखे आहे असा टोला त्यांनी लगावला
          सदरच्या कामात राष्ट्रीय महामार्ग निर्मितीत सेंसर पेव्हर मशीन अनिवार्य असताना योग्य मशीन न वापरता साधे मॅन्युअल मशीन वापरून काम चालू आहे. हे काम अतिशय निकृष्ट पध्दतीने झाल्यामुळे अतिशय रहदारीचा, जड वाहनाच्या रहदारीचा असल्यामुळे मजबूतीकरण न झाल्यामुळे रस्ता टिकणार नाही.
          आमच्या कोपरगाव शहराच्या हद्दीत काम चालू असताना आपले जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. झालेल्या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई व्हावी. निविदे प्रमाणे शहर हद्दीत काम झालेले नाही.
          तात्काळ उद्या भरारी पथकाने माझ्या समक्ष पहाणी करावी व अहवालाची एक प्रत मला द्यावी. आपण माझ्या ईमेल ला उत्तर न दिल्यास गुरूवारी (दि. २३) रोजी सकाळी १० ते १ वाजे पर्यंत साईबाबा चौफुलीवर रा मा ७५२ जी वर मी दोन तास उन्हात ढोल वाजवून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या भ्रष्टाचाराचा निषेध व्यक्त करणार. असा इशारा देऊन आमचा कोपरगाव शहराचा विकास आपले भ्रष्ट कारभारामुळे सन १९९० पासून निकृष्ट रस्त्यामुळे खुंटला आहे.तेही काळे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page