कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील घटनेची शहानिशा व्हावी. – विमल पुंडे
The incident at Kopargaon Rural Hospital should be investigated. – Vimal Punde
दोषींवर कारवाईची शिवसेना महिला आघाडीची मागणीShiv Sena Mahila Aghadi demands action against the culprits
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon27 Feb23 ,16.40 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : ग्रामीण रुग्णालयात झालेले स्टिंग ऑपरेशन आणि त्या प्रत्युत्तरा दाखल करण्यात आलेली विनयभंगाची तक्रार या घटनेची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी होऊन त्याची शहानिशा व्हावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या, कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल दत्ता पुंडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
Video Player
Media error: Format(s) not supported or source(s) not found
Download File: http://vruttavedh.com/wp-content/uploads/2023/02/VID-20230227-WA0050.mp4?_=1महिलांवर खरोखर अत्याचार झालेला असल्यास त्यांनी गप्प न बसता पुढे येऊन तक्रार करायलाच हवी. ज्यामुळे अशा प्रवृत्तींना आळा बसेल परंतु कोणाच्या तरी इशाऱ्यावर चुकीच्या तक्रारी दाखल करुन महिलांनी आपला वापरही होऊ देता कामा नये. अन्यथा खरोखर अन्याय झालेल्या पिडीतेच्या बाबतीतही समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन बसेल. आणि लांडगा आला रे आला या म्हणीप्रमाणे खऱ्याखुऱ्या
पिडीत महिला मात्र यात भरडल्या जातील.
प्रसिद्धी माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखून केवळ ब्रेकिंग न्यूज साठी व सबसे तेज आम्हीच आहोत हे दाखवण्यासाठी दिल्या गेलेल्या बातम्या समाजात चुकीचे संदेश पोहोचवितात. यासाठी जागृत राहून बातम्या देताना काळजी घ्यावी. अशी विनंती या प्रसंगी प्रसार माध्यमांना केली आहे.
Post Views:
524