ग्रामीण रुग्णालयात त्या पहाटे गैरहजर असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा बडतर्फ करा -संजय काळे

ग्रामीण रुग्णालयात त्या पहाटे गैरहजर असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा बडतर्फ करा -संजय काळे

File criminal charges against those who were absent that early in the morning at the rural hospital and dismiss them -Sanjay Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon27 Feb23 ,16.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगाव तहसीलदार यांनी त्या पहाटे  ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या भेटीत  गैरहजर असलेल्या डॉक्टर कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे, तसेच वैद्यकीय अधीक्षक यांनी मुख्यालय सोडले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा  अशी मागणी  येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली असून  यासाठी आपण  आज मंगळवारी (२८)  रोजी ग्रामीण रुग्णालयासमोर भर उन्हात  दुपारी तीन ते पाच ढोल बजाव आंदोलन सत्याग्रह करणार असल्याचा इशारा जिल्हा राज्य चिकीत्सक, सिव्हील हॉस्पीटल,पत्रकार चौक,अहमदनगर. यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार विजय बोरूडे यांनी गुन्हा केला असेल तर त्यांचेवर गुन्हा दाखल होऊन ते बडतर्फ झालेच पाहिजे. तहसिलदार ग्रामीण रुग्णालयात अपरात्री भेटीला गेले असता त्यांचे गाडीचे चालकाने त्यांचे संभाषणाचे व दवाखान्यातील कर्मचाऱ्यां सोबतचे दोन व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केले आहे, एका चित्रफिती मध्ये दवाखान्यात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला प्रश्न विचारला डॉक्टर किंवा नर्स असले बाबत. त्या कर्मचारी व तहसिलदार यांनी नर्सला मोठ्या आवाजात हाका मारल्या. नर्स एका रूम मध्ये दार बंद करून झोपलेल्या होत्या.
             तहसिलदारांनी रुग्णांना देखील त्रास दिला असे समाज माध्यमांवरील बातम्यात मी ऐकले/ वाचले. म्हणजे रुग्णालयात रुग्ण असताना कर्तव्यातील कर्मचारी रात्रपाळीला झोपले कसे. ते देखील खोलीचे दार बंद करून त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे, त्याची दखल कोण घेणार, 
             तहसिलदार यांनी महिला कर्मचाऱ्याला ड्युटी रजिस्टर मागितले. त्यात ग्रामीण रुग्णालयात ५२ चा स्टाफ असताना, रात्रीच्या वेळेस संपूर्ण दवाखाना केवळ एकाच नर्सच्या भरवश्यावर सोडल्याचे त्या चित्रफितीत स्पष्ट दिसते. कर्तव्यात असलेले इतर डॉक्टर व स्टाफ दवाखान्यात नसल्याचे तहसिलदारांनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले.
               तेवढ्या रात्री त्यांनी मेडीकल सुप्रीडेंट/ वैद्यकिय अधिक्षक यांना फोन केल्याचे चित्रफितीत स्पष्ट दिसते. जर शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून डॉक्टरांसाठी निवास आवारातच बांधलेले आहे. तर डॉक्टर आवारात का निवास करीत नाही. त्या रात्री वैद्यकिय अधिक्षक यांनी आपले मुख्यालय कसे सोडले ? त्यांनी चार्ज कुणाकडे दिला होता.? रात्री दवाखान्यात एक देखील डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नाही याला ग्रामीण रुग्णालय म्हणायचे कि प्राथमिक आरोग्य केंद्र. 
         
           त्या रात्री कर्तव्यात असलेले पण रुग्णालयात गैरहजर असलेले कर्मचारी,  ऑन कॉल येणाऱ्या डॉक्टरांना देखील तात्काळ बडतर्फ करावे.तसेच हजर असून, कर्तव्याचे दरम्यान खोलीचे द्वार बंद करून झोपलेल्या कर्मचाऱ्यांना देखील तात्काळ बडतर्फ, निलंबीत करावे.
 अशा प्रकारे तहसिलदारांनी केलेल्या स्टींग ऑपरेशनला जर उत्तर आपले विभागातील संघटीत गुन्हेगारी देत असेल तर माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर आपण आयपीसी ३५३ च लावणार?तहसिलदारांवर गुन्हा दाखल करून आपण आपले कार्यालयाचे कर्मचाऱ्यांना तर अभय देत नाही ना? जर तहसिलदारांनी गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण रात्रीच्या वेळेस कर्तव्यात असलेले पण रुग्णालयात हजर नसलेले सगळेच गुन्हेगार आहेत. त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा  तात्काळ बडतर्फ करावे या मागण्या काळे यांनी लेखी पत्रकात  केल्या आहेत या मागण्यासाठी आपण आज मंगळवारी दिनांक (२८)रोजी दुपारी भर उन्हात तीन ते पाच  ढोल बजाव सत्याग्रह करणार आहे.हि नोटीस समजावी.असे संजय भास्करराव काळे पत्रात नमूद केले आहे. सदर प्रत त्यांनी समाज माध्यमावरही टाकली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page