तहसीलदारांच्या समर्थनार्थ महसूल ग्रामपंचायत व संघटना उतरले मैदानात; खोटा गुन्हा मागे घेण्याची  केली महत्वाची मागणी

तहसीलदारांच्या समर्थनार्थ महसूल ग्रामपंचायत व संघटना उतरले मैदानात; खोटा गुन्हा मागे घेण्याची  केली महत्वाची मागणी

Revenue Gram Panchayats and organizations came to the fray in support of Tehsildars; An important demand was made to withdraw the false case

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 Feb23 ,20.40 Pm By राजेंद्र सालकर

 कोपरगाव :-  कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे  यांनी कोपरगाव ग्रामीण  रुग्णालयातील  स्ट्रिंग ऑपरेशनची ऑडिओ  क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली.या क्लिप मध्ये ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेने तहसीलदार यांनी  कशा प्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना   अवार्च्य भाषेत  शिवीगाळ केली व आपल्यासह एका रुग्णाच्या नातेवाईक  महिलेशी असभ्यवर्तन केल्याचे  कथन  केले शहर पोलिसात  तहसीलदार बोरुडे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून  परिचारिकेने   यांनी सर्वाना ह्दरावून सोडले आहे. दरम्यान तहसीलदार बोरुडे यांना अटकपूर्व जामीन  मिळाला आहे

याप्रकरणी काल मंगळवारी महसूल कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय समोर  तहसीलदार विजय बोरूडे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी एक दिवसीय उपोषण केले . तिकडे संजय काळे यांनी त्यादिवशी ड्युटीवर गैरहजर हजर असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कार्य कारवाई व्हावी यासाठी भर उन्हात ढोल बजाव आंदोलन सुरू केले होते 
तर शहरात शहरातील वंचित आघाडी  रिपाई आठवले गट  शिवसेना महिला आघाडी  तालुक्यातील विविध ठिकाणच्या ग्रामपंचायती सरपंच  ग्रामसेवक तलाठी  यांनी  आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा प्रस्ताव देत, नायब तहसीलदारांची भेट घेऊन  निवेदन दिले. तहसीलदार बोरुडेंच्या समर्थनार्थ अनेक महिला संघटनांचे आयोगाला पत्र- आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती
 या प्रकरणाची सखोल  चौकशी करा  खोटा गुन्हा मागे घ्या , अशी मागणी या निवेदनात केली.
 त्यामुळे कोपरगाव तालुक्यात तालुक्यात अधिकार असताना ग्रामीण रुग्णालयात भल्या पहाटे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी गेलेला एक  तहसीलदार अधिकारी सुरक्षित नसेल, खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडत असतील तर  सर्वसामान्य नागरिकांचे  काय ?  तर यापेक्षा गांभीर्य परिस्थिती अजून तालुक्यात काय असू शकते.
संजय काळे यांनी त्याबाबत लेखी पत्र पाठवले होते, त्याची दखल घेत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी एल सायगावकर व डॉ. व्ही. आर. पडोळे यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांची टीम काळे यांच्या झालेल्या आरोपा नंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. संजय काळे यांच्या आरोपांची व त्यांच्या आंदोलनाची दखल घेत त्याचा अहवाल ते जिल्हा शल्य चिकित्सक यांना देणार आहेत.                                          
दरम्यान संजय काळे यांनी आपण हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर नेऊन त्याचा पाठपुरावा करून गोरगरीब रुग्णांना न्याय मिळवून देऊ यासाठी चंग बांधला आहे. काळे यांच्या आंदोलनाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी मात्र भेट दिली नाही असे संजय काळे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page