शिवबा माझा मानाचा एक्स्पो २०२३ : सलग १२ वर्ष
Shivba Maja Manacha Expo 2023 : 12 consecutive years
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 March23 ,19.40 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : Shivba Expo : “शिवबा माझा मानाचा; एक्सपो आपल्या गावाचा” हे घोषवाक्य घेऊन १२ व्या वर्षात पदार्पण करीत लायन्स,लिनेस व लिओ क्लब कोपरगाव आयोजित कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रायोजित बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रायोजक संजीवनी ग्रुप हे आहेत तर गोदावरी दूध व समता पतसंस्था हे सहप्रायोजक आहेत.
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन या ठिकाणी शिवबा एक्सपो शुभारंभ ९ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे ९ ते १४ मार्च असे सहा दिवस पर्यंत सुरु राहणार आहे. हा एक्सपो पाहण्यासाठी १० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
शिवबा एक्सपो ९ ते १४ मार्चपर्यंत
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित लेझर शो, किल्ले बनवा चित्रकला स्पर्धा, रायबा !हेच आपलं स्वराज्य… (महानाट्य), निबंध स्पर्धा, लिटिल चॅम्प्स ग्रुप डान्स स्पर्धा, रंग बरसे (हास्य कवी संमेलन) वकृत्व स्पर्धा, सुपर वुमन, सुपरस्टार ग्रुप डान्स स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ,व नृत्याविष्कार तुझ्या कार्यक्रमांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन केले जाणार आहे, यात शहरासह राज्यातील विविध प्रकारचे दीडशे स्टॉल सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला जाण्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक असेल.
९ ते १४ मार्चपर्यंत हा एक्सपो सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत मनमुराद आनंद घेता येणार आहे.अशी माहिती एक्सपो कमिटी ला.राजेश ठोळे,ला. सत्येन मुंदडा, ला.संदीप कोयटे, ला.राम थोरे ला.संदीप रोहमारे ला.सुरेश शिंदे ला.नरेंद्र कुर्लेकर ला.राहुल नाईक यांनी दिली आहे. निमंत्रक लायन्स क्लब अध्यक्ष ला. परेश उदावंत, लिओ क्लब अध्यक्ष लिओ सुमित सिनगर,लिनेस अध्यक्ष लिनेस डॉ. अस्मिता लाडे हे आहेत.