पांडुरंग सावली सभामंडप मंदीर सौंदर्यात भर घालणारा- राघवेश्वरानंदगिरी
Pandurang Savli Sabhamandap Temple Adding to the Beauty – Raghaveshwaranandagiri
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 March23 ,11.20 Am By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील निवारा परिसराची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या सर्वत्र ख्याती आहे.घराला घरपण देणारी निवारा परिसरातील माणसे असून पांडुरंगसावली सभा मंडप मंदीरांच्या सौंदर्यात भर घालणारा असल्याची भावना महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली.
महादेव मंदिर व हनुमान मंदिर सभा मंडपासाठी समता पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांनी दिली होती.
यावेळी काका कोयटे म्हणाले की, या महादेवाच्या मंदिरात दररोज सकाळी काकड आरती हरिपाठ भजन यामुळे गेल्या ३८ वर्षापासून या ठिकाणी धार्मिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी कांतीलाल जोशी, विजय बंब
ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे, बापूसाहेब इनामके, राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाऱ्या ४ शिक्षक,
१८ सेवानिवृत्त शिक्षक,श्री जगन्नाथ बैरागी व सौ.सुमन बैरागी या मान्यवरांचा सत्कार काका कोयटे, महंत राघवेश्वरानंदगिरी व श्रीमती पुष्पलता सुतार, महादेव मंदिर व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.
ह.भ.प.विकास महाराज गायकवाड यांचे किर्तन झाले .
सुत्रसंचालन अनंत बर्गे यांनी केले. यावेळी समता पतसंस्थेचे संचालक चांगदेव शिरोडे, बद्रीनाथ डागा, बाळूशेठ बजाज,विजय बंब, पदाधिकारी, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, युवराज गांगवे, सौ.दिपा गिरमे, लक्ष्मीनारायण भट्टड, सुरेंद्र व्यास, नागरिक, उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी समता पतसंस्था, महादेव मंदिर व्यवस्थापन समिती, निवारा भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार जनार्दन कदम यांनी मानले.