कोट्यावधीचा निधी देऊन मुस्लिम कब्रस्तानचे प्रश्न सोडविले- आ. आशुतोष काळे 

कोट्यावधीचा निधी देऊन मुस्लिम कब्रस्तानचे प्रश्न सोडविले- आ. आशुतोष काळे 

Solved the problem of Muslim cemetery by giving crores of funds – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 March23 ,19.30 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव :-सर्व समाजाला समान न्याय देतांना समाजमंदिरासाठी कोट्यावधी निधी दिला असून मतदार संघातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे प्रलंबित असलेले कब्रस्तानचे प्रश्न सोडविले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे सांगितले .

ते म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यानी नेहमीच सर्वधर्मसमभाव जपतांना सर्वच समाजाला मदत करून मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. हि परंपरा पुढे अबाधित ठेवून मागील साडेतीन वर्षात मतदार संघाच्या कब्रस्तानसाठी १ कोटी ८५ लाखाचा निधी दिला आहे. 

तसेच स्मशानभूमीचे अनेक वर्षापासूनचे मंजूर, करंजी, कोळगाव थडी, चितळीचे जागेचे प्रश्न सोडविले आहे. चांदेकसारे, सुरेगाव, धामोरी, धारणगाव, कुंभारी कब्रस्तानच्या जागेचा प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले 

यावेळी मौलाना आसिफ, मौलाना मुक्तार, मौलाना रियाज, मौलाना यासीन सय्यद,   दिलीपराव बोरनारे,  दिनार कुदळे, संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,  विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकिर कुरेशी, दिनकर खरे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे,  सुनील शिलेदार,  नवाज कुरेशी, निखील डांगे, जावेद शेख, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, आंबदास वडांगळे, राजेंद्र आभाळे, नितीन साबळे, गणेश बोरुडे, मनोज नरोडे, अक्षय आंग्रे, सागर लकारे, राकेश शहा, प्रदीप मते, विलास पाटोळे, उमेश दीक्षित, परख कांबळे, लक्ष्मण सताळे, कैलास मंजुळ, तेजस साबळे,  अण्णासाहेब मासाळ, सलिम पठाण, शकील खाटीक, रियाज सर, पप्पूजी सय्यद, अबुजर अत्तार, शाहबाजई पठाण, रेहान शेख, अल्तमज शेख, गयाज पठाण, अरबाज शेख, नोमान शेख, इनायत पठाण, रफिक शेख, हारूण शेख, चांदभाई पठाण, अश्पाक शेख, निसार पठाण, डॉ. जाकीर शेख, अल्ताफ शहा, मुख्याध्यापक मोबिना शेख, फरहद सिद्दीकी आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page