कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे-रमेश घोडेराव
Workers should give priority to safety – Ramesh Ghoderao
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 March23 ,16.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कामगार सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देवुन जिल्हयात सर्वप्रथम येथील कामगारांना मोफत हेल्मेट वाटप केले त्याचा सर्वांनी वापर करावा त्याचबरोबरच कारखाना व्यवस्थापनात काम करतांना कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी गुरुवारी कारखाना कार्यस्थळावरील ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहात बोलताना केले केले.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी राज्यात सर्वप्रथम येथे विविध रासायनिक उपपदार्थ निर्मीतीबरोबरच कामगारांच्या सुरक्षेसाठी दर्जेदार सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून दिली. आपल्यासह परिसरातील नागरिकांची तसेच कुटूंबातील व्यक्तींची सुरक्षा अबाधित रहावी यासाठी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, व अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे सततचे प्रयत्नांतुन व्यवस्थापनात सुरक्षितता सप्ताह आयोजित करून त्यातुन प्रबोधन केले जाते. दैनंदिन जीवनांत मनुष्याच्या किरकोळ चुकीने मोठी दुर्घटना घडु शकते, त्यासाठी सतर्कता महत्वाची आहे. तसेच आपण स्वतः, कुटूंब, गांव, तालुका, राज्य व देशपातळीवर सुरक्षीततेचे महत्व हे सर्वोच्य असले पाहिजे असेही त्यांनी नमुद केले.
कामगार नेते मनोहर शिंदे म्हणाले की, आपत्कालीन स्थितीत काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण संजीवनीत देवून दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाते. अलिकडेच गंगामाई साखर कारखान्यात इथेनॉल आगीची दुर्घटना अटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करावयाच्या याबाबत अभ्यासू व्यक्तीमत्व अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेसह प्रशिक्षीत कर्मचारी बांधवांनी जी काळजी घेतली त्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले आहे. आगप्रतिबंधक फोममुळे ही आग लवकर अटोक्यात आली तेंव्हा कामगारांनी काम करतांना सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे.
कारखाना व्यवस्थापनात वर्षभर आगीसह अन्य दुर्घटना घडू नये यासाठी दक्ष असलेल्या कामगारांना संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, निलेश देवकर, सतिष आव्हाड, यांच्याहस्ते प्रमाणपत्र व बक्षिसांचे वाटप करण्यांत आले. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी कामगारांना सुरक्षा शपथ देवुन कारखान्यातील सुरक्षाउपाययोजनांचा वार्षीक आढावा सादर केला. या कार्यक्रमासाठी सर्व खातेप्रमुख उपखातेप्रमुख विविध विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुरक्षा झेंडावंदन व सुरक्षा उपकरणांचे प्रदर्शनाचा कामगारांनी लाभ घेतला.