बचत गटाने महिलांची घरात आणि समाजात पत वाढवली; सौ. स्नेहलता कोल्हे
Self-help groups increase women’s credit in the home and in the community; Mrs. Snehlata Kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 March23 ,16.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : त्यांची स्वतःची ठेव इतकी झाली आहे की आज महिला बचत गटाला बँकेकडून कर्ज घेण्याची गरज राहिली नाही. परिणामतः बचत गटात काम करणाऱ्या महिलांची त्यांच्या घरात आणि समाजात पत वाढली. असल्याचे गौरव उद्गार भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी महिलादिनी खिर्डी गणेश येथील महिला बचत गटाच्या बैठकीत व्यक्त केले.
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महिला बचत गट हा माझ्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे.माझी सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात महिला बचत गट चळवळीतून झाली.१५-२० वर्षांपूर्वी मी महिला बचत गटाचे काम सुरू केले होते. तेंव्हा ग्रामीण भागातील महिलेला वाटायचे की, मी बचत गटात भरलेले ५०-१०० रुपये वाया जातील का? मी बँकेत वेगळे खाते उघडलेले, मी बचत गटात पैसे भरलेले माझ्या घरच्या लोकांना आवडेल का? अशी भीती महिलांना वाटत होती. त्यांच्या मनातील ही भीती मी दूर केली.
सौ कोल्हे म्हणाल्या की, समविचारी महिला एकत्र आल्यामुळे महिलांच्या कला व गुणांना वाव मिळत आहे. महिला बचत गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे, महिलांचे उद्योगातील धाडस व कार्यक्षमता वाढत आहे, महिलांना व्यवसायातील भाग भांडवल उपलब्ध होत आहे, महिलांना राष्ट्रीयकृत बॅंकींग क्षेत्रातील व्यवहाराची माहिती मिळत आहे, बचत गटामुळे महिला लघुउद्योग व स्वयंरोजगार करून सक्षम होत आहेत, स्त्री दृष्टीकोनाबाबत पुरूषांच्या मानसिकेतत बदल होत आहे. त्यामुळे त्यांचा कुटुंबातील दर्जा वाढत आहे, बचत गटामुळे महिलांचे उद्योग वा व्यवसायातून आर्थिक सशक्तीकरण होत आहे.घर आणि परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या महिलांनी गावच्या विकासात सहभाग घेतल्यास गावाबरोबर राष्ट्राचा विकास करतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य सरकार जनतेच्या हितासाठी, महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनाच्या या विविध योजनांचा गरजूंनी लाभ आवाहन त्यांनी यावेळी केले
याप्रसंगी सरपंच चंद्रकांत चांदर, उपसरपंच नीलेश वराडे, ग्रामसेविका जयश्री शेलार, जि. प. शाळेच्या श्रीमती पवार, नंदा रोहम, साधना वराडे, सरला चांदर, रूपाली आहेर, भारती खंडीझोड, अनिता गोधडे, मनीषा बर्डे,अनिता चांदर, सुनीता काळे, अर्चना गोसावी यांच्यासह सप्तशृंगी, बालाजी, स्वामी समर्थ, शिवनेरी, आदिशक्ती, भीमाशंकर, पंचशील, वैष्णवी, भाग्यश्री, दीक्षा, महालक्ष्मी, मातृछाया, तुळजा भवानी आदी महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्य तसेच खिर्डी गणेश व पंचक्रोशीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.