चिमुकल्यांच्या  नृत्यविष्काराने डोळ्यांची पारणं फिटली -सौ.  ससाणे

चिमुकल्यांच्या  नृत्यविष्काराने डोळ्यांची पारणं फिटली -सौ.  ससाणे

Dazzling with the dancing of the little ones -Mrs. Sasane

कोपरगाव :स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयातील देश रंगीला यासंकल्पनेवर 

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 10 March23 ,20.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर केलेला नृत्यविष्काराने  डोळ्यांचे पारणे फिटले.असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्याध्यापिका सौ.सुनिता ससाणे यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी यशवंत आंबेडकर हे होते.

महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, राजस्थान, आसाम, बंगाल, गुजरात, जम्मू काश्मीर, गोवा या राज्यातील संस्कृतीचे दर्शन त्या राज्यातील कला प्रकार सादर केले. 
माधव पोटे यांनी  मनोगतातून चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराचे कौतुक केले.
यावेळी  मुख्याध्यापक.माधव पोटे, प्रा.यशवंत आंबेडकर, कोयटे विद्यालयाचे संस्थापक काका कोयटे, अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, 
समता  स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती  कोयटे,.रंगनाथ खानापूरे, .सुरेंद्र व्यास, सौ.मीना व्यास, सौ.जोत्स्ना पटेल, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग  उपस्थितीत होते. 
 काका कोयटे म्हणाले की, निवारा परिसरात २७ वर्षापूर्वी  १९९६ साली या  विद्यालयाची स्थापना केली. आज कोयटे विद्यालय  चिमुकल्यांवर संस्कार करणारे विद्यालय आहे.
 विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
 शिक्षिका सौ.तृप्ती कासार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ यांनी  प्रास्ताविक केले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभावरी नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, वाहतूक विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.  सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार समता  सीमा सोमासे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page