अर्थसंकल्पात कोपरगावच्या काही रस्त्यासाठी २५.५० कोटी रुपये मंजूर
25.50 crore sanctioned for some roads of Kopargaon in the budget
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 10 March23 ,15.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कोपरगाव मतदारसंघातील काही रस्त्यासाठी २५.५० कोटी निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी गुरुवारी (दि.९) दिली आहे.
आ. आशुतोष काळे म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना निधी मिळावा याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश लाभले आहे. त्यामुळे निश्चितच या रस्त्यांसाठी आता निधीची उपलब्धता झाली असल्याने या महत्त्वाच्या रस्त्यांची लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.
२५.५० कोटी निधीत रा.मा.६५ अंजनापुर ते रांजणगाव देशमुख रस्ता (०५ कोटी), चास-वडगाव-बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) रा.मा. ६५ (कोपरगाव ते धारणगाव रस्ता) सुधारणा करणे (०४ कोटी), रा. मा.०७ धामोरी, येसगाव रस्ता (प्र.जि.मा.०४) येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (०४ कोटी), बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) (मंजूर गाव ते बक्तरपुर रस्ता) सुधारणा करणे (२.५० कोटी), रा.मा. ७ रस्ता (प्रजिमा ८५) सा. क्र.०/५०० मध्ये कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती करणे (०३ कोटी), उक्कडगाव रस्ता रा.मा.६५ (करंजी फाटा ते कॅनॉल पर्यंत रस्ता) मध्ये सुधारणा करणे (२.५० कोटी), रा.म.मा.५० (रा.मा.३६) शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा करणे (२.५० कोटी), रामपूर वाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा ८७) मध्ये सुधारणा करणे (०२ कोटी) या कामांचा समावेश असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली. उर्वरित निधी लवकरच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Post Views:
126