कोपरगाव गोदावरीकालव्यात  बुडून तरुणाचा मृत्यू

कोपरगाव गोदावरीकालव्यात  बुडून तरुणाचा मृत्यू

A young man died after drowning in Kopargaon Godavari canal

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 March23 ,
20.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला तरुण सुनील लहानु माळी (२६) हा आपल्या मित्रासमवेत पोहण्यासाठी काल ११ वाजेच्या सुमारास गोदावरी कालव्यांवर गेला असता त्याच्या कंबरेला बांधलेली दोरी पाण्यात उडी मारताना तुटल्याने तो सदर कालव्यात वाहून गेला होता.

 त्याचा मृतदेह आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शहाजापूर शिवारातील गोदावरी उजव्या कालव्यात आढळून आला आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
गोदावरी कालव्यांना नुकतेच उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यात पोहण्यास शहाजापूर येथील तरुण सुनील लहानु माळी काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गेले होते. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो सदर कालव्यात बेपत्ता झाला होता. त्यास शोध घेण्याचे काम तेथील रहिवासी रमेश भोंगळ व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केले होते. त्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा रात्री उशिरा पर्यंत शोध सुरु होता मात्र तो मिळून आला नव्हता. त्यासाठी मोठी शोध मोहीम राबवली मात्र त्याला शोधण्यास अपयश आले होते. 
दरम्यान आज सकाळ पासून पुन्हा एकदा हि शोध मोहीम कोपरगाव तालुका पोलिसांनी सुरु केली होती. दरम्यान त्याचे शव आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शहाजापूर शिवारातील गोदावरी कालव्याच्या पात्रात आढळून आले आहे. सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतुन शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला आहे.
सदर तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री.कोकाटे हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page