संजीवनी पाॅलीटेक्निक: ४४ विद्यार्थ्यांची ब्रेम्बो ब्रेक्समध्ये निवड- अमित कोल्हे        

संजीवनी पाॅलीटेक्निक: ४४ विद्यार्थ्यांची ब्रेम्बो ब्रेक्समध्ये निवड- अमित कोल्हे

 Sanjeevani Polytechnic: 44 students selected in Brembo Brakes- Amit Kolhe

 आधी नोकरी मग निकालJob first then results

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 15 March23 ,18.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव: ब्रेम्बो ब्रेक्स या बहुराष्ट्रीय  कंपनीने संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या तब्बल ४४ विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली यामुळे संजीवनी पॉलिटेक्निक मध्ये जॉबची शाश्वती याला पुष्टी मिळाली असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की ब्रेम्बो ब्रेक्स ही मुळची इटालियन कंपनी असुन जगात तीन खंडात १५ देशात  कार्यरत आहे. उच्च कार्यक्षमता कार आणि मोटर सायकलच्या ब्रेकिग सिस्टिमच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात ही आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये  केतकी राजेंद्र गरूड, प्रिती विलास कोते, पुजा रघुनाथ सरोदे, अक्षदा बाळासाहेब सांगळे, नम्रता विश्वास  कोळगे, ऋतुजा नंदकुमार गोळे, मयुरी नानासाहेब गाढवे, शिवकन्या शेषराव  कांबळे, प्रथमेश  अनिल कोळगे, नचिकेत युवराज येशी , स्वयंम महेश  जंगम, प्रतिक ज्ञानेश्वर  पगारे, हिमांशू  राजेंद्र शिंदे , धिरज  साळभाऊ नरवडे, कुनाल जयराम पवार, ओम संजय काळे, कृष्णा  दिपक शेळके, नितिन दिलीप सालपुरे, प्रतिक मंगेश  नाईकवाडे, सुमित वाल्मिक भड, अनुज गंगाधर हरदे, राधेय योगेश शिंदे , फायझान फरीद शेख, रेवननाथ दगडू धनवटे, साहिल नामदेव जाधव, हर्षद  अनिल पवार, तेजस दादासाहेब शेळके, मोहम्मद साजिद रझा, आशुतोष कुमार तिवारी, रंजन कुमार, आकाश कुमार पांडेय, प्रेम कुमार, दिपाली रतन म्हस्के, नसरूल्लाह अन्सारी, गौरव शिवाजी  जाधव, ऋषिकेश  अच्युत फोपसे, अनुप कुमार पांडेय, स्नेहल संजय शिंदे , जितेंद्र कुमार यादव, गौरव हारिभाऊ भोगे, ऋतुजा मनोज गुंजाळ व ओम भिकन डांगे यांचा समावेश  आहे.
           
अमित कोल्हे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचा  सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद, प्रा. गिरीश  वट्टमवार, प्रा. अमोल ढाकणे, प्रा. गणेश  गव्हाणे व प्रा. राहुल भाकरे उपस्थित होते. 
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीनदादा कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनीही सर्व निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page