कोपरगावात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, ३ चिमुकल्यांना चावा ; पालिका प्रशासनावर युतीची आग पाखड
Stray dogs attack, bite 3 toddlers in Kopargaon; Coalition fire on municipal administration
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 15 March23 ,18.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून बुधवारी संजय नगर हनुमान नगर आयेशा कॉलनी परिसरात कुत्र्याने तीन लहान मुलांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या भाजप सेना रिपाई युतीच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनावर आग पाखड केली. ताबडतोब बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला .
शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने, कुत्रा चावा घेल्याच्या घटनेत वाढ झाली. बुधवारी सकाळी हमजा जावेद अत्तार (वय ३ वर्षे, रा. आयेशा कॉलनी), हसनीन इम्रान तांबोळी (वय ६ वर्षे, रा. संजयनगर) आणि फैजल मोहसीन शेख (वय ४ वर्षे, रा. हनुमाननगर) या परिसरात कुत्र्याने तीन लहान मुलांना चावा घेतल्याची घटना घडली आहे
कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांसह नागरिक रात्रीचे १० नंतर घराबाहेर पडण्यास भीत आहेत, एवढी दहशत भटक्या कुत्र्याची शहरात निर्माण झाली. पालिकेने भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात व मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद प्रशासन साफ अपयशी ठरले आहे. मात्र, नागरिकांकडून सक्तीने करवसुली केली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने आधी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तोपर्यंत करवसुलीची गाडी शहरात फिरू देऊ नये.अशी मागणी युतीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली आहे.
यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, माजी नगरसेवक बबलू वाणी, विनोद राक्षे, दिनेश कांबळे, मेहमूद सय्यद, वैभव गिरमे, राजेंद्र लोखंडे, पिंकी चोपडा, अल्ताफ कुरेशी, खालिक कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, एस. पी. पठाण, अल्ताफ पठाण, रोहित कनगरे, अजितभाई तांबोळी, इम्रान हुसेन तांबोळी, तौसिफ तांबोळी, जुनेद तांबोळी, फिरोज अत्तार आदींसह भाजप, शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.