हा तर कोपरगावकरांसाठी सामाजिक व धार्मिक सोहळा सौ स्नेहलता कोल्हे
This is a social and religious ceremony for the people of Kopargaon- Mrs. Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 29 March24 ,20.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : श्रीराम नवमीनिमित्त मुंबादेवी तरुण मंडळाचा तीन दशकांचा श्री साईगाव पालखी व कथा सप्ताह हा तर कोपरगावकरांसाठी सामाजिक व धार्मिक सोहळा असल्याचे गौरवउद्गार माजी आमदार भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे मंगळवारी (२८) रोजी महंत कालिकानंद महाराज यांच्या आदिशक्ती कथा महात्म्य कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना केले.
त्या पुढे म्हणाल्या साई गाव पालखीला कोल्हे परिवाराचे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे २९ वर्षांपूर्वी या सोहळ्याची सुरुवात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते झाली होती. २४ मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो कोल्हे परिवाराने साई गाव पालखीला आजपर्यंत नेहमी सर्वांगीण सहकार्य केले आहे व पुढेही करीतच राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याबरोबर त्यांना आधार, ऊर्जा आणि बळ देण्याचे काम महंत श्री कालिकानंद महाराज यांच्या तू मधुर वाणीतील आदिशक्ती महात्म्य कथेने केले असल्याचे त्या म्हणाल्या,
यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच भाजप भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह भाविक व मुंबादेवी तरुण मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक व्यासपीठावरून हजारो भाविकासमोर शिष्टाचार न पाळता राजकीय भाष्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.