आत्मा मालिक चैत्र महोत्सव; वैश्विक महाकुंभमेळ्याची पर्वणीच – संत परमानंद महाराज
Atma Malik Chaitra Festival; The celebration of the universal Maha Kumbh Mela itself – Sant Parmanand Maharaj
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 29 March24 ,20.40 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : परम पूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलीच्या पावन सानिध्यात ध्यान योग मिशन च्या वतीने आयोजित चैत्र महोत्सव म्हणजे जगभरातील भक्तांसाठी विज्ञान, आरोग्य अध्यात्म किर्तन ध्यान व आत्मज्ञान याचा संगम असणारी सहा दिवसांची भव्य दिव्य वैश्विक महाकुंभमेळ्याची पर्वणीच आहे, अशी माहिती आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली
व सकल आत्मा मालिक संतपीठाच्या उपस्थितीत दिनांक १ एप्रिल ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीत कोकमठाण आश्रमामध्ये आत्मा मालिक चैत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, तिन वर्षाच्या खंडानंतर परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक संत पीठाच्या सानिध्या मध्ये या सहा दिवस आत्मज्ञानपर आधारीत विविध विषयावरील मार्गदर्शन, तज्ञाची व्याख्याने, संत महंतांची प्रवचने तसेच किर्तन महोत्सव व दररोज विविध आजारांवरील तपासणी व उपचारांचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे
या दिव्य महातिथीचा अमृतयोग सकत भाविकांना अनुभवण्यास मिळावा म्हणून हे विशाल आयोजन काकड आरती, मौन ध्यान, भजन, प्रवचन, हरिपाठ, सत्संग, गुरुयाग व किर्तन महोत्सवासह महादिंडी सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दिनांक १ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वा आत्म पादूका पूजनाने या महोत्सवाची सुरवात होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्या भाविकानी ४५ दिवसाचे उपवास केले आहेत अशा भाविकांचा अनुष्ठान विधी रात शांतीमाई यांचे करकमलाद्वारे संपन्न होणार आहे.
परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊली व सकल आत्मा मालिक सतपीठाच्या समवेत चैत्र शुध्द चौदस दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता ध्यान योग विद्यासंस्थान सत्संग हॉल मधून पायी भव्य दिव्य दिंडी सोहळ्यास अर्थात नगर प्रदिक्षणा सोहळ्यास सुरवात होईल. या दिंडी सोहळात बँड पथक, ढोलपथक सनई चौघडा, पालडी कलश यात्रा व आत्मरथ यांचा समावेश रहाणार असून सदर दिंडी सोहळ्यात आत्मा मालिक विविध सत्संग मंडळाचे भाविक पारंपारिक वेषभूषेत सहभागी होणार आहेत. या दिंडी सोहळ्याचे विसर्जन “आत्मरूप ध्यान मंदिर” मध्ये महाआरतीने होणार आहे.
या प्रसंगी बोलताना आत्मा मालिक ध्यान योग निशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी सागितले चैत्र महोत्सवासाठी सत्संग व महाप्रसादासाठी ७० हजार स्क्वेअर फुटाची मंडप व्यवस्था उभारण्यात आलेली आहे सत्संग हॉल मध्ये अद्यायावत ध्वनिक्षेपन यंत्रणा एल.ई.डी स्किन लावण्यात आलेल्या आहेत भाविकाच्या सोईसाठी आश्रमाच्या वतीने प्रसाद स्वागत दर्शन, वाहनतळ स्वच्छता, पाणीपुरता, आदि समित्याचे गठन करण्यात आलेले आहे.या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आता मालिक ध्यानपीत ऑफिशीयल या यूट्यूब चैनल वरती केले जाणार आहे.
सहा दिवसीय या महोत्सवासाठी येणा-या भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. या महोत्सवासाठी कॅनडा ऑस्ट्रेलिया मलेशिया येथील परदेशीय भाविक आले आहेत
उत्सवा दरम्यान चालू होणा-या अखंड अन्नछत्रा बद्दल माहिती देताना त विवेकानंद महाराज यांनी सांगितले प्रसादालय समितीच्या वतीने उत्सव काळात माविकासाठी अहोरात्र महाप्रसाद व्यवस्था सुरू रहाणार आहे भाविकासाठी पंचपक्वान्नाच भोजन देताना त्या मध्ये पुरी, चपाती, भाजी, वरणभातः मठ्ठा, जिलेबी आमरस, श्रीखंड असे निरनिराळे मिष्ठान्न दिले जाणार आहेत तसेच पिण्यासाठी थंड आर ओ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाप्रसादाची सर्व व्यवस्था व सेवा ही प्रसादालय समितीचे प्रमुख प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे व त्याची संपूर्ण टीम संभाळणार असून आश्रमातील विविध विभाग भाविकांच्या अखंड सेवेसाठी सज्ज रहाणार आहे.
यावेळी आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे सदस्य संत विवेकानंद महाराज सत चंद्रानंद महाराज, संत सत्पात्रानंद महाराज, संत साधनानंद महाराज, संत आनंद महाराज, संत राजनंद महाराज, संत जितेंद्रानंद महाराज संत किरणानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज संत विजयानंद महाराज, संत योगानंद महाराज, सत पठारे महाराज, संत सेवादास महाराज, संत शेलार महाराज, संत सर्वेशानंद महाराज संत प्रभावती माई संत स्मृतीमाई, विश्वरत श्री बाळासाहेब गोरडे व सकल संत व संतमाता उपस्थित होते.
परमपूज्य सदगुरू माऊलींच्या अधिष्ठानाखाली संपन्न होणा-या चैत्र महोत्सवाचे महोत्सवासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल संतपीठ व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे
Post Views:
113