खा. गिरीश बापट हे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड -स्नेहलता कोल्हे
Kha. Girish Bapat is a learned and cultured leader behind the curtain of time-Snehlata Kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 29 March24 ,21.00 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन ही अतिशय दुख:द बातमी आहे. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असून, आपण एक आदर्श लोकप्रतिनिधी, प्रामाणिक आणि निष्ठावंत नेता गमावला आहे, भारतीय जनता पार्टीची खूप मोठी हानी झाली अशा शब्दांत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी खा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, माझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात ते मंत्री असताना मतदार संघातील विकास कामासाठी मला त्यांचे खूप सहकार्य मिळाले आमचे बौद्धिक घेताना शिस्तीचे धडे ही त्यांनी आम्हाला दिले झुंजार व्यक्तिमत्व असलेले खा.गिरीश बापट यांची पक्षावर त्यांची अजोड निष्ठा होती. दुर्धर आजाराशी झुंजत असतानादेखील गिरीश बापट पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते पक्षासाठी कार्य करत होते. आजारातून ते बरे होऊन सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता; पण तो विश्वास नियतीने खोटा ठरवला आहे. आमदार म्हणून नव्हे तर मुलीप्रमाणे त्यांनी माझ्यावर माया केली त्यांच्यासोबत माझ्या अनेक आठवणी असल्याच्या भावना यावेळी सौ स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्ष कोपरगाव विधानसभा मतदारसंघ व संजीवनी उद्योग समूहाच्या आणि कोल्हे परिवाराच्या वतीने खा. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Post Views:
108