कोपरगावच्या साईगाव पालखीचे मोठ्या उत्साहात शिर्डीकडे प्रस्थान
Saigaon Palkhi of Kopargaon leaves for Shirdi with great enthusiasm
कोपरगाव ते सावळविहीर १२ किलोमीटर भक्तांची रांगDevotees queue for 12 kilometers from Kopargaon to Savalvihir
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 30 March23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सनई चौघडा च्या निनादातढोल ताशांच्या गजरात सोबतीला फटाक्यांचीआतिषबाजी.. गुलालाची उधळण करत स्वागताला भगवे ध्वज. पताका सर्वत्र सडापाना फुलांच्या रांगोळ्यांच्या पायघड्या…. सोबतीला छत्र, चामर, ध्वज चांदीच्या पालखीत साईबाबांची प्रतिमा…. उदाच्या वासाने दरवळलेले सुगंधित वातावरण.सोबतीला अश्व, आकर्षक वेशभूषा.. नारंगी फेटे.टोप्या घातलेले तरुण-तरुणी स्त्रिया.नागरिक…. पावलोपावली सद्गुरु साईनाथ महाराजांचा जयजयकार…
ठिकठिकाणी पालखीचे निरांजनीने ओवाळून स्वागत…. भक्तांच्या स्वागता साठी सरबत,आईस्क्रीम, मठ्ठा, कुल्फी, उसाचा रस, गुडदाणी, साबुदाणा खिचडी, चिवडा यांची वाटपाची केलेली सोय अशा भक्तिभाव युक्त वातावरणात हजारो साई भक्तांच्या साक्षीने कोपरगाव ची मानाची पालखी डौलदारपणे शिर्डीच्या साईबाबांना भेटीसाठी निघाली…. साई गाव पालखीच एक टोक शहरात तर दुसरे टोक सावळी विहीरच्याही पुढे होते…
याशिवाय दिव्यांगांनाही पालखी समवेत जाण्याची इच्छा पूर्ण केली यावर्षी भाविक भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता…. साई गाव पालखीचे आमदार आशुतोष काळे, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सपत्नीक ,श्री साईगाव पालखीची विधिवत पूजा केली तसेच सर्व आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते यांनी पालखीचे मनोभावे पूजन करीत दर्शन घेतले.
शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता. मानाची साई गाव पालखी असल्याने बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवली होती. विकी जोशी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी साई पालखीचे जेसीबीतून फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत केले. पालखी सोहळ्याच विजय कासलीवाल यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सलग २९ व्या वर्षी तहसील कार्यालय मैदानावर नजीक यावर्षी आठ दिवस कथाकार आचार्य श्री कालिकानंद महाराज नाशिक यांचा रसाळ वाणीतून आदिशक्ती महात्म्य कथेवर आधारित सोहळा ठेवला होता त्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद भाविक भक्तांनी दिला. शुक्रवार दिनांक ३१ रोजी सकाळी नऊ ते एक मुंबादेवी मंदिरा जवळ महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे .