काकडीकरांनी काय नुसते तुमच्या ढगातील उडणाऱ्या विमानाकडे पाहायचं का ? स्नेहलता कोल्हे
Do cucumbers just want to look at your airplane flying in the clouds? Snehlata Kohle
इतकी असंवेदनशीलता कुठून येते?, स्नेहलता कोल्हे यांचा प्राधिकरण अधिकाऱ्यांना संतप्त सवाल; कारण काय?Where does such insensitivity come from?, Snehalata Kolhe angrily asked the authority officials; What is the reason?
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 30 March23 ,18.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : काकडी सारख्या छोट्या ग्रामपंचायतचे सहा कोटी रुपयांची थकबाकी विमान प्राधिकरणाने थकवली आहे त्यामुळे विकास खोळंबला असल्याने साई भक्तांसाठी अल्प दरात जमिनी देणाऱ्या काकडीकरांच म्हणणं ऐकून घ्यायला विमान प्राधिकरण तयार नाही.इतकी असंवेदनशीलता कुठून येते?, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचा प्राधिकरण अधिकाऱ्यांना संतप्त सवाल; कारण काय? त्यांनी काय नुसते तुमच्या ढगातील उडणाऱ्या विमानाकडे पाहायचं का ? असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिर्डी विमानतळावर एका कार्यक्रमासाठी आल्या असता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची काकडी ग्रामस्थांनी भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचताना जगभरातून शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठी आम्ही अल्प दराने कमी मोबदल्यात विमान प्राधिकरणाला पंधराशे एकर जमीन दिली त्यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या गावाचा विकास करू शाळा देऊ रस्ते देऊ लोकांना नोकऱ्या देऊ अशी भरघोस आश्वासने दिली साईबाबा इंटरनॅशनल विमानतळ काकडी हे नाव दिले नाही. ग्रामपंचायतचे करापोटीचे सव्वा सहा कोटी रुपये विमान प्राधिकरणाने थकवले आहे त्यामुळे या छोट्या ग्रामपंचायतचा विकास ठप्प झाला आहे . लोकांना आश्वासनाप्रमाणे पैसा दिला नाही मुलांना नोकरी देऊ ही आश्वासने प्राधिकरणाने आजपर्यंत पाळली नाहीत केवळ आश्वासने देऊन प्राधिकरणाने आमच्या तोंडाला पाणी पुसली लोकप्रतिनिधी आणि नेते येतात ऐकून घेतात आश्वासन देऊन निघून जातात परंतु आजपर्यंत आमच्या प्रश्नाबाबत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही अशा तक्रारी काकडीकरांनी सौ कोल्हे यांच्याकडे व्यक्त केल्या.
विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणावर आसूड ओढतांना सौ कोल्हे म्हणाल्या, विमानांची उड्डाणे सुरू झालीत विमानसेवा सेवा सुरू झाली आता रात्रंदिन विमान सेवा ही लवकरच सुरू होईल. परंतु ज्या काकडीकरांनी यासाठी जमिनी दिल्या त्या काकडीकरांच्या पदरात पडले काय ? प्राधिकरणाकडून ठरल्याप्रमाणे व आश्वासनाप्रमाणे कुठल्याही सुविधा व सवलती आज पर्यंत देण्यात आलेल्या नाहीत काकडीकरांनी काय नुसते तुमच्या ढगातील उडणाऱ्या विमानाकडे पाहायचं का ? लवकरात लवकर काकडी करांच्या प्रश्नांची तड लावली नाही तर काकडीकरांना सोबत घेऊन मला वेगळा विचार करावा लागेल असा स्पष्ट इशारा सौ कोल्हे यांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना शेवटी दिला
Post Views:
133