काळे कारखान्याच्या ६८ व्या गळित हंगामाची सांगता; साखर निर्यातीसाठी आणखी ३० लाख मे.टन. परवानगी मिळावी-आ आशुतोष काळे
Kale Factory’s 68th season concludes; Another 30 lakh MT for sugar export. Ashutosh Kale should get permission
५ लाख २४ हजार ९४८ टन उसाचे गाळप; ११.५७ साखर उतारा5 lakh 24 thousand 948 tons of sugarcane bagasse; 11.57 sugar extract
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 31 March23 ,19.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : निर्यातीसाठी मिळालेल्या कोठयानुसार सरासरी ३६४४ विक्रमी दराने एक लाख २१ हजार ६४० क्विंटल पांढरी साखर आंतरराष्ट्रीय बाजारात विकली. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ४००० रुपये क्विंटल आहेत तेव्हा सरकारने निर्यातीसाठी आणखी २५ ते ३० लाख मे. टन साखर विकण्यास परवानगी द्यावी असे अजित पवार यांनी म्हटले आहे. माझी प्रामुख्याने निर्यात कोठा वाढवून मिळावा हीच मागणी असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ आशुतोष काळे यांनी काळे कारखान्याच्या ६८ व्या गळित हंगामाची सांगताप्रसंगी केली. समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.
आशुतोष काळे पुढे म्हणाले, येथील कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगाम १३३ दिवस चालला या हंगामात ५ लाख २४ हजार ९४८ टनाचे गाळप झाले. सहा लाख सात हजार ४०० पोते साखर उत्पादन झाले तर सरासरी साखर उतारा ११.५७ मिळाला आहे. कार्यक्षेत्रात चार लाख ३९ हजार ४०४ मॅट्रिक टन ऊस मिळाला तर बाहेरून ८५ हजार ५४४ मेटन ऊस आणावा लागला. गाळप क्षमता वाढवल्यानंतर झालेला पहिल्या टप्प्याच्या पहिल्याच गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी मक्तेदार, कारखान्याचे कर्मचारी, तोडणी वाहतूक यंत्रणा व तोडणी मजूर यांचे सामुहिक प्रयत्न कामी आल्यामुळे ६८ व्या हंगामाची सांगता यशस्वी झाली,
गाळप सांगता समारंभाची पूजा शुक्रवारी दुपारी तीन वाजता कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. दिलीप बोरणारे व सौ. अलका बोरणारे या उभयतांच्या हस्ते विधीवत पूजा करून संपन्न झाली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले.
कारखान्याच्या ६८व्या गळीत हंगामाची सांगता झाल्यानंतर बोलताना काळे म्हणाले, ‘कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. पाच महिन्यामध्ये विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले. या मशनरीच्या परीक्षणासाठी वेळ लागल्यामुळे १२ ते १३ दिवस कारखाना उशिरा सुरू झाला शेतकरी तोडणी मजूर व कर्मचारी यांचे नुकसान होऊ नये म्हणून दरम्यान विखे कारखान्याला २०६७२ मे.टन व थोरात कारखान्याला ७२७९ मे.टन असा २७ ९५१ मे.टन ऊस कराराने गाळपासाठी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना अत्याधुनिक करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून विस्तारीकरण वेळेत होणार नाही व कारखाना सुरू होणार नाही, असे काही जण बोलत होते. मात्र कामगारांनी आणि मक्तेदारांनी अहोरात्र काम करून विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. विस्तारीकरणानंतर पहिला चाचणी हंगाम असतो. मात्र या हंगामातही सभासदांच्या विश्वासाहर्तेच्या जोरावर सुमारे सव्वा पाच लाख टनाचे गाळप झाले हाही उच्चांकच आहे. मागच्या गाळप हंगामापेक्षा २० ते२५ टक्के कमी गाळप झाले’हंगामात हेक्टरी सरासरी ६४ मे. टन उत्पादन मिळाले गतवर्षीच्या तुलनेत १७ मे.टन टक्के कमी आहे.
अद्यावत मशिनरीच्या विस्तारीकरणामुळे २०२३-२४ च्या येणाऱ्या हंगामात दररोज सहा हजार मे.टन उसाचे गाळप होणार आहे. ऊस कमी नको जबाबदारी वाढली आहे १०० ते १२० दिवसात सात लाख मे.टन गाळपचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. पाहुण्यारावळ्यांना न्याय देऊ, नाशिक, वैजापूर, राहता नांदगाव, येवला येथील आपल्या जवळच्या लोकांना संपर्क करा, ऊस नोंदणी सुरू झाली आहे. चांगले नियोजन करूया, शेतकरी विभाग व शेतकरी विकास विभाग यांनी एकत्रित काम करावे, शेतकऱ्यांनी नवीन जाती नवीन वाण लावण्याचा प्रयोग करावा विस्तारीकरणामुळे लॉसेस कमी होणार आहेत संगणकीकरणामुळे मनुष्यबळ कमी लागणार आहे, सगळ्या सुविधा दिल्या आहेत, उत्पादन आणि गाळप उतारा वाढणार आहे, बगॅस होणार नाही याची काळजी घ्या लोकांनी बगॅसचा त्रास खूप सहन केला त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नका. एसी केबीन झाल्या म्हणून झोपा काढू नका तर त्याचा वापर व कामकाज योग्य रीतीने करा अशा सूचना त्यांनी यावेळेस अधिकारी, कर्मचारी, मक्तेदार तोडणी मजूर यांना दिल्या.
पुढील गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने होणार आहे. सभासदांनी उसाची नोंद आतापासूनच द्यावी. सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले. आभार संचालक डॉक्टर मच्छिंद्र बर्डे यांनी मानले.
यावेळी पद्माकांतकुदळे, एम.टी. रोहमारे,ज्ञानदेव मांजरे,काकासाहेब जावळे, कचरु घुमरे. व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे,शिवाजीराव घुले,दिनार कुदळे, सुरेश जाधव, विष्णू शिंदे,श्रावण आसने, गंगाधर औताडे, जीनिंग प्रेसींगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, एक्झिक्युटिव्ह संचालक भिकाजी सोनवणे,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ तसेच कर्मवीर काळे काळे उद्योग समूहाचे, कारखान्याचे सर्व पदाधिकारी संचालक अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
एफ आर पी पेक्षा दिलेल्या ज्यादा रकमेवर इन्कम समजून सरकारने साडेनऊ हजार कोटीचा इन्कम टॅक्स राज्यातील साखर कारखान्यावर लावला होता तो केंद्राने व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी माफ केला त्याबद्दल मी त्यांचे आवर्जून अभिनंदन करतो
Post Views:
147