व्यायामात सातत्य ठेवून आजार टाळावे – डॉ रोकडे
Diseases should be prevented by regular exercise – Dr. Rokade
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue4 April23 ,18.40 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : धावपळ आणि बैठे काम यामुळे वजन वाढते त्या पाठोपाठ रक्तदाब थकवा साखर आजार बळावतात यापासून सुटका होण्यासाठी प्रत्येकाने व्यायामात सातत्य ठेवून हजार टाळावेत असे आवाहन डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनी भैरवनाथ वेलनेस फिटनेस क्लब चांदेकसारे यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात केले.
यावेळी भैरवनाथ वेलनेस फिटनेस क्लबचे व्यवस्थापक संजय कानडे, सरपंच किरण होन, माजी सरपंच केशवराव होन, पोलीस पाटील मीराताई रोकडे, सुनील खरात, मिलिंद झगडे, सुभाष होन, कर्ना होन, युनुस शेख, मलू होन, रावसाहेब होन, विश्वनाथ होन अदी उपस्थित होते.
यावेळी संजय कानडे यांनी क्लबच्या अंतर्गत परिसरातील हजारो नागरिकांना दररोज मोफत व्यायाम मार्गदर्शन, पहाटे ऑनलाईन व्यायामाचे वर्ग अदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. काल या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा चांदेकसारे पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी फायदा घेतला.
Post Views:
176