समताच्या विद्यार्थ्यांची इजिप्त दुबई आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहल –  सौ.स्वाती  कोयटे

समताच्या विद्यार्थ्यांची इजिप्त दुबई आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहल –  सौ.स्वाती  कोयटे

EGYPT DUBAI INTERNATIONAL EDUCATION TOUR OF SAMATA STUDENTS – Ms.Swati Koyte

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 5 April23 ,16.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलने इजिप्त मधील एसीआयसी (ACIC) अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलसोबत सांस्कृतिक व शैक्षणिक  करार करण्यात यश मिळविले. या अंतर्गत २६ मार्च ते ३१ मार्च दरम्यान इजिप्त, दुबई आंतररष्ट्रीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती सहलीच्या माध्यमातून या देशांना भेट देऊन या देशांची संस्कृती इतिहास बघायला मिळाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव अनुभवायला मिळाले असल्याची माहिती  समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी दिली.

पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध  उपक्रमाबरोबर विविध देशातील शैक्षणिक ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी   दरवर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत असते असेही त्या म्हणाल्या 
इजिप्सियन शाळांना भेट दिली असता भारतीय शाळांमधील शैक्षणिक धोरण आणि इजिप्सियन शाळांमधील शैक्षणिक धोरण याबाबत चर्चा केली. तसेच जगातील सात आश्चर्यांपैकी एक प्रसिध्द पिरॅमिड ऑफ गिज्जा, स्फिंक्स व्हॅली, जगातील सर्वात लांब नाईल रिव्हर, मोतांजा पॅलेस, काटा कॉम ऑफ एल शोकाफा, जगातील सर्वात मोठी अलेक्झांड्रिया लायब्ररी, इजिप्त मधील म्युझियम या ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. तर दुबई शहराची सफर करताना शहरातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती घेत दुबईतील बुर्ज खलिफा, ग्लोबल व्हिलेज, मिरॅकल गार्डन, एक्वेरियम, फाऊंटन शो अनुभवला.अबुधाबी फेरारी वर्ल्डला भेट देऊन तेथील राईडचा आनंद घेतला. या सहली दरम्यान समताचे विद्यार्थी ईशान कोयटे, देशना अजमेरा, माही संचेती, अर्णा कुंकूलोळ, भक्ती न्याती यांनी इजिप्सियन शाळांमध्ये मनोगत व्यक्त करून भारतीय संस्कृती विषयी माहिती दिली.
समताच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहलीचे गाईड .देवेंद्र सासणे , स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक .संदीप कोयटे, प्राचार्य सौ.हर्षलता शर्मा, उपप्राचार्य . समीर अत्तार आदींसह शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Leave a Reply

You cannot copy content of this page