गौतम बॅंकेला ३ कोटी १६ लाख विक्रमी नफा    

गौतम बॅंकेला ३ कोटी १६ लाख विक्रमी नफा

 3 Crore 16 Lakh record profit for Gautam Bank

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 5 April23 ,16.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव   : बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे  कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी ३ कोटी १६ लाख रुपयांचा नफा मिळवीला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पावडे यांनी दिली आहे.

 कर्मवीर शंकरराव काळे यांनी कारखान्या बरोबरच गौतम सहकारी बँकेची देखील स्थापना केली. बँकेच्या माध्यमातून कामगार, शेतकरी व परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची आर्थिक अडचण सुटण्यास मोठी मदत झाली. मात्र मागील काही वर्षात बँकेने खडतर परिस्थितीवर मात करून बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे.

Hide quoted text

चालू आर्थिक वर्षात बँकेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ८८ तरतुदी करून १ कोटी २८ लाख निव्वळ नफा मिळविला आहे. आज मितीस बँकेचे वसुल भाग भांडवल रुपये ५०९.८८ लाख इतके आहे. बँकेच्या ठेवी १०५ कोटी ९३ लाख असून बँकेने ६६ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ५१ कोटी ७८ लाख असून राखीव व इतर निधी १३ कोटी ५० लाख आहे. रिझर्व बँकेच्या मापदंडाप्रमाणे सी. आर. ए. आर. ९ टक्के असणे आवश्यक आहे. त्याचे प्रमाण  बँकेने २० टक्के राखलेले आहे. बँकेची तरलता मध्ये जादा तरतूद आहे. बँकेची लिक्विडिटी मध्ये अद्याप डिफॉल्ट नाही. बॅकेचा सी.डी रेशो ६२.५४ टक्के इतके आहे. बॅकेचा नेट एन.पी.ए प्रमाण २.६७ टक्के आहे. थकबाकी प्रमाण ३ टक्के राखले असून बॅकेने अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे माध्यमातून कार्यक्षेत्रातील होतकरू ग्रामीण भागातील उद्योजकांना लघु उद्योग धंद्यास चालना देण्यासाठी सर्वसाधारण रुपये ४० कोटीचे बिनव्याजी कर्ज वितरण केलेले आहे. अशाप्रकारे बँकेने सर्व घटकांना न्याय देऊन प्रतिकूल परिस्थितीत आपली प्रगती देखील साधली आहे. यामध्ये बँकेचे माजी संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, सर्व अधिकारी, शाखा प्रमुख व कर्मचारी, सभासद, कर्जदार यांचे मोलाचे योगदान आहे. बँकेच्या प्रगतीबद्दल माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

      

Leave a Reply

You cannot copy content of this page