स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्यासाठी २५ लाख रुपये मंजूर
25 lakhs sanctioned for Vaishali scooter to Amardham road due to special efforts of Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 5 April23 ,16.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : माजी आमदार तथा भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत नवीन प्रभाग क्र.४ मधील वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाला असून त्या या कामास प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असल्याची माहिती कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे
हा प्रमुख व वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे काम व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती; परंतु विद्यमान आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी शासनाकडून निधी मिळण्यासाठी सातत्त्याने पाठपुरावा केला होता. अखेर कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, नवीन प्रभाग क्र.४ मधील वैशाली स्कूटर ते अमरधाम रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून, या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा निधी मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, कैलास जाधव, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुलशेठ काले आदींनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
Post Views:
404