स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचा लाभ; अखंड स्वामीनाम जप, सामूहिक गुरुचरित्र पारायण, गणेश याग आदी कार्यक्रमांची रेलचेल
Benefit of Mahaprasad on the death anniversary of Swami Samarth Maharaj; Akhand Swaminam Chanting, Mass Gurucharitra Parayana, Ganesh Yag etc
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue18 April23 ,17.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ‘या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते. यंदा श्री स्वामी समर्थांची १८ एप्रिल २०२३ रोजी पुण्यतिथी आली, गुरूचरित्र पारायण सोहळा व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह संपन्न झाला आहे.
अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभाची तिथीभगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून आयोजिला जातो, यंदा चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी १८ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
शहरातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता.रोज सकाळी सामुदायिक गुरुचरित्र पठण करण्यात येत होते. त्यानंतर सकाळची आरती व त्यानंतर साडेदहा वाजता नैवेद्य आरती होत असे
या सप्ताह काळात नवनाथ भागवत श्रीपाद श्रीवल्लभ पारायण, अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड दोन स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग,गीताई याग,स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी टाळमृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, आदी धार्मिक दिंडोरी प्रणित निवारा स्वामी समर्थ केंद्रात पार पडले.सप्ताह काळात दररोज अनेक यागांचे होम हवन सुरू असून शुक्रवारी चंडीयाग हा संपूर्ण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. या यागात सहभाग घेतलात कुलदेवीची कृपा प्राप्त होऊन वैवाहिक व कुटुंब समस्या निवारण होते. तसेच हवन युक्त दुर्गा सप्तशती पाठ हा करण्यात आला. या चंडीयागासाठी पुरुष व महिला अशा एकूण सुमारे 170 सेवेकर्यांनी भाग घेऊन दुर्गा सप्तशती पाठ होम हवन केले. या चंडीयागासाठी निवारा, सुभद्रानगर, ओमनगर, रचना पार्क यापरिसरासह शहरातून अनेक महिला व पुरुष वर्ग यांनी सहभाग नोंदवला. बोल अंबा माता की जय अशा आईसाहेब यांच्या जयघोषाने श्री स्वामी समर्थ दरबार हा गजबजलेला होता. या धार्मिक कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतले.सामुदायिक गुरुचरित्र पारायणासाठी 132 सेविकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. दिवस रात्रीच्या पहाऱ्यासाठी 160 श्री पुरुष व तरुणांनी सहभाग नोंदविला. दररोज सायंकाळी महेश गावंड सेवेकर्यांशी हितगुज साधले. स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्गाची उकल करून सांगितली
शनिवारी कारवाडी केंद्राचे संतोष भाऊ जाधव यांनी सेवेकरांना मार्गदर्शन केले
सोमवारी सायंकाळी आमदार आशुतोष काळे यांनी स्वामी दर्शन घेतले यावेळी त्यांनी या केंद्रातील सभागृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याची जाहीर केले शहरात गेल्या साडेतीन-चार वर्षात शहरासाठी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. मंगळवारी सप्ताह सोहळा समाप्तीच्या दिवशी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते साडेदहाची नैवेद्य आरती झाली यावेळी त्यांनी केंद्रात आपल्या सर्वांच्या सेवेमुळे येथे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र निर्माण झाले आहे. शहरातील स्वामी समर्थ केंद्रासाठी दहा लाखाचे सभागृह बांधून दिले असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे निवारा येथील नव्या मंदिरासाठी लागणाऱ्या मदतीची ग्वाही दिली
या सप्ताह काळात केंद्र प्रमुख हरिभाऊ गिरमे, अरविंद रुईकर, अश्विनी गावंड, पत्रकार राजेंद्र सालकर, महेश गोसावी, विश्वनाथ गुरसळ, चंद्रकांत वाघ, बोठरे, श्रीपाद कुलकर्णी, योगेश सारंगधर, किरण खर्डे, सिद्धार्थ पाटणकर, अक्षय माळवे विकी खर्डे, सौरभ गिरमे, आदित्य डुचे, कुलकर्णीताई, गुरसळताई, माधुरी सालकरताई, जाधवताई यांनी विशेष परिश्रम घेतले
Post Views:
244