मुस्लिम समाज सदैव काळे परिवाराच्या सोबत  – आ. आशुतोष काळे

मुस्लिम समाज सदैव काळे परिवाराच्या सोबत  – आ. आशुतोष काळे

Muslim society always with the kale family – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue18 April23 ,17.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे     व माजी आमदार अशोक काळे यांनी सर्व जाती धर्माचा आदर करून सर्वधर्मसमभाव जपल्यामुळेच मला देखील सर्व समाजाकडून भरभरून  प्रेम मिळत असून यात मुस्लिम.समाज देखील कुठेही मागे नसून मुस्लिम समाज सदैव काळे परिवाराच्या सोबत असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी सोमवारी गौतम बँकेच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या  इफ्तार  पार्टीत केले .

ते पुढे म्हणाले की,पवित्र रमजान महिन्यात ४० अंश सेल्सिअस तापमान असतांना मुस्लिम बंधू भगिनी करीत असलेले उपवसातून रमजानच्या पवित्र महिन्याचे धार्मिक महत्व अधोरेखित होते.निवडून आल्यापासून मतदार संघातील मस्जिद, कब्रस्तान उर्दू शाळा इमारतींना मोठ्या प्रमाणात निधी देवून इतर समाजाप्रमाणे मुस्लिम समाजाला देखील न्याय दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते  पहिल्यांदाच रोजाचा उपवास धरणाऱ्या नन्हे रोजगाराचा घास भरवून त्याचा उपवास सोडवला.

यावेळी मौलाना निसार अहमद नदवी, मौलाना यासीन मित्ली, मौलाना अबजल मित्ली, मौलाना मुक्तार मित्ली, मौलाना अनिस मित्ली आदींसह कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम बांधव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page