अध्यात्म सेवा दैवी शक्तीच्या रूपाने आम्हास प्रेरणा देते- विवेक कोल्हे

अध्यात्म सेवा दैवी शक्तीच्या रूपाने आम्हास प्रेरणा देते- विवेक कोल्हे

Spiritual service inspires us in the form of divine power – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue18 April23 ,18.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :विज्ञान जेथे थांबते तेथुन पुढे अध्यात्माचा प्रवास सुरू होतो आणि हीच अध्यात्माची सेवा सतत संकटे हरण करण्यासाठी दैवी शक्तीच्यारूपाने आम्हांस प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखाना कार्यस्थळावरील स्वामी सेवा केंद्रातील गुरुचरित्र पारायण सोहळा सांगता प्रसंगी केले
मंगळवारी (18 एप्रिल) रोजी सकाळी विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे या उभयतांच्या हस्ते आरती करण्यात आली.

विवेक कोल्हे म्हणाले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा सामाजिक वसा पुढे नेत असताना बिपिनदादा कोल्हे व सौ स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे.दैनंदिन जीवनांत संघर्ष, संकटे ही ठरलेली असतात त्यातून समर्थपणे मार्गाक्रमण करण्यासाठी दैवी शक्ती कामी येते, स्वामी सेवेत सर्वांचा जनसहभाग महत्वाचा असतो .
गेल्या अठरा वर्षात पस्तीस गुरूचरित्र पारायणे येथे संपन्न झाली.
याप्रसंगी शिंगणापुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने डॉ कृष्णा पवार यांनी शासनाचे अभा आरोग्य कार्ड नोंदणीकरणाची माहिती देवुन उपस्थितांना मोफत आरोग्य तपासणी सह औषधांचे वितरण केले.
संचालक विश्वास महाले, बाळासाहेब वक्ते, शिवाजी वक्ते, बापूसाहेब बारहाते, रमेश आभाळे, बाळासाहेब पानगव्हाणे, विक्रांत् पाचोरे, यादवराव संवत्सरकर, अशोक लोहकणे, मुख्य अभियंता के. के. शाक्य, उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उसविकास अधिकारी शिवाजीराव देवकर, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख आदि समर्थ सेवेकरी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, समर्थ सेवेतुन प्रत्येकाच्याभोवती सुरक्षा कवच तयार होत असते. जीवनाच्या रथाला गुरू मार्ग दाखवतो त्यातुन जन्मत:, शिक्षण समाजसेवा, प्रतिभासंपन्न व अलौकीक ज्ञानाची प्राप्ती होते. मनुष्याने जीवन कसं जगावे याची शिकवण गुरूचरित्रातुन मिळते, संत समाजाला घडवत असतात.
१४० पारायणार्थीनी यात सहभाग नोंदविला. सुत्रसंचलन संगणक विभागाचे चंद्रकांत जाधव यांनी करून आभार मानले. महिलांसह तरूणवर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.

.

Leave a Reply

You cannot copy content of this page