कर्तव्यदक्षता :स्नेहलता कोल्हे यांनी अपघातातील जखमीला उपचारासाठी दाखल करून  वाचवले प्राण

कर्तव्यदक्षता :स्नेहलता कोल्हे यांनी अपघातातील जखमीला उपचारासाठी दाखल करून  वाचवले प्राण

Conscientiousness: Snehlata Kolhe saved the life of the accident victim by admitting him for treatment

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed19 April23 ,17.00 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव पुणतांबा रस्त्यावर  अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी हाेऊन बेशुद्ध पडलेल्या दुचाकीस्वारावर माजी आमदार भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने  भ्रमणध्वनीवरून रुग्णवाहिका बोलावून  संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्य़ाबाबत  हॉस्पिटल प्रशासनाला सूचना दिल्या. त्यामुळे गंभीर जखमीला तातडीने मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला. त्यांनी या कर्तव्यदक्षपणातून माणुसकीचे दर्शन घडवले.

अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि 18 ) रोजी सव्वा पाच वाजेच्या सुमारास पुणतांबा कोपरगाव रस्त्यावरील कोकमठाण शिवारातील साविल  ऍग्रो कंपनीच्याच्या वळणावर दुचाकीवरून पडल्याने   एक तरुण  गंभीर जखमी होवून रस्त्याच्या कडेला पडलेला होता . त्याचवेळी पुणतांबा येथील आपले नियोजित कार्यक्रम आटोपून  माजी आमदार स्नेहलता कोल्हे  या कोपरगावकडे येत असताना  त्यांनी  गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडलेल्या दूचाकीस्वाराला पाहिले  त्यांनी आपली गाडी थांबवून स्वतः खाली उतरून  विचारपूस करीत तातडीने रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारासाठी नजीक असलेल्या  संत जनार्दन स्वामी रुग्णालयात  दाखल केले. एवढ्यावरच न थांबता रुग्णवाहिकेपाठोपाठ  दवाखान्यात जाऊन स्वतः रुग्णाची  विचारपूस करून त्याच्यावर होत असलेल्या उपचाराची संबंधित डॉक्टरांकडून माहिती घेतली.धोका नसल्याचे समजल्यानंतर संबधीत डॉक्टरांना सूचना देऊन त्यानंतर त्या पुढे निघून गेल्या,
रुग्णांच्या नातेवाइकांनी अत्यंत भावनिक होत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले. सध्याच्या धावपळीच्या युगात अशी रुग्णसेवा करणारे लोक पहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे.  माजी आमदार  स्नेहलता कोल्हे यांच्या  कोल्हे परिवाराच्या परंपरेला साजेसे मदतीच्या  कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जखमी इसम हा गोंडेगाव तालुका श्रीरामपूर  येथील असून त्याचे नाव संजय कुऱ्हाडे  असल्याचे कळते. त्याच्यावर संत जनार्दन स्वामी  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौकट 

रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाल्यास त्या जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी नागरिक बघ्याची भूमिका घेताना दिसतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा व्यक्तींना वाटणारी कोर्ट कचे-यांची व पोलिसांकडून दिल्या जाणा-या त्रासाची भीती. त्या अपघातग्रस्त व्यक्तीला जर वेळीच उपचार मिळाले तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात. ते धाडस एक महिला असूनही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले तसेही रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्यांना मदत करणे ही कोल्हे परिवाराची परंपरा राहिली आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page