ग्रामदैवत श्रीलक्ष्मीआईच्या आशीर्वादाने शहर विकासाची प्रेरणा – आ. आशुतोष काळे
The inspiration of city development with the blessings of village deity Sri Lakshmi – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed19 April23 ,17.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव :शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे आराध्य दैवत असलेल्या ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई मातेच्या आशीर्वादाने कोपरगाव शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई माता यात्रौत्सवानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी श्री लक्ष्मीआई मातेच्या चरणी नतमस्तक होवून महाआरती करून आशीर्वाद घेतले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन महोत्सवाप्रसंगी ह.भ.प. वनिताताई पाटील महाराज यांच्या किर्तनाचा त्यांनी लाभ घेतला. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, कोपरगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढतांना पाणी, रस्ते, आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देवून कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई मातेच्या आशीर्वादाने सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे लवकरच ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगावकरांना नियमित पाणी मिळणार आहे. यापुढील काळातही श्री लक्ष्मीआई मातेच्या प्रेरणेतून कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. यात्रौत्सवानिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आ. आशुतोष काळे यांनी देखील पंक्तीमध्ये भक्तांना महाप्रसादाचे वाटण्याची सेवा केली.
यावेळी ह.भ.प. शिवाजी महाराज ठाकरे, धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगूले, मंदार पहाडे, रमेश गवळी, ऋषीकेश खैरनार, सुनील फंड, अर्जुन दुबे, विकास आढाव, गोरख कानडे, संतोष शेलार, रोहित खडांगळे, गणेश कानडे, जर्नादन शिंदे, सोमेश शिंदे, मनोज नरोडे, नीरज ऊदावंत, मनोज विसपुते, महेश ऊदावंत, विनोद मोरस्कर, रमेश टोरपे, महेश मते, प्रदीप मते, अनिल शिंदे, प्रसाद सोनवणे, अमोल देवकर, राहुल कहार आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.