शासकीय योजनेपासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या – आ. आशुतोष काळे
Make sure that no one is left out of the government scheme – Aa. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 24 April23 ,19.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- शासनाच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी तळागाळातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला आहे. तेंव्हा एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.
तहसील कार्यालय कोपरगाव येथे सोमवार (दि.२४) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना, दिव्यागांना दिव्यांग प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड व शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले कि, मागील १ वर्षात कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या ९००० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. ४५०० कुटुंबांना नवीन रेशन कार्ड देण्यात आले आहेत. दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी पुढाकार घेवून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यागांना व त्यांच्या नातेवाईकांना जाण्यासाठी केलेल्या मोफत सुविधा व सहकार्यातून जवळपास ७०० दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यात यश आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील अतिशय कमी वेळात आणि कमी श्रमात जातीचा दाखला मिळावा यासाठी ‘जातीचा दाखला सहाय्यता शिबिर’ या ‘जातीचा दाखला सहाय्यता शिबिराच्या माध्यमातून जातीच्या दाखल्यांची २००० प्रकरणे शासन दरबारी दाखल करण्यात आली असून लवकरच त्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
चौकट :-आ. आशुतोष काळे यांनी योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतःची यंत्रणा उभी केली असून ‘जातीचा दाखला सहाय्यता शिबिर’ अशा उपक्रमांमुळे नागरिकांना होणारा मोठा त्रास वाचला असून हे उपक्रम जनतेसाठी व सर्व सामान्य नागरिकांसाठी वरदान ठरले असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, शिवाजी घुले, गोरक्षनाथ जामदार, नानासाहेब चौधरी, बापूराव जावळे, मंदार पहाडे, फकीर कुरेशी, नवाज कुरेशी, दिगंबर बढे, साहेबलाल शेख, योगेश गंगवाल, प्रशांत घुले, शैलेश साबळे व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.