संजीवनीच्या  विद्यार्थ्यांना   रेनाटाप्रिसिझमध्ये  ५. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज – अमित कोल्हे

संजीवनीच्या  विद्यार्थ्यांना   रेनाटाप्रिसिझमध्ये  ५. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज – अमित कोल्हे

 In Renataprecise to the students of Sanjivani. 5 lakh annual package – Amit Kolhe

                                 

नोकरी मिळवुन देण्याच्या  उच्चांक पार High score for getting a job

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 24 April23 ,20.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम सत्रातील श्रेयश  लोहकणेे, शिवकुमार  पंजाबी व सत्यम  लासुरे या तीन विध्यार्थ्यांची रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. पुणे या नामांकित  ५. ५ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर  नोकरीसाठी  निवड  केल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये सरकारी आस्थापनामध्ये नोकरी मिळावी या हेतूने माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९८३  साली केली होती, तो त्यांचा उद्देश सफल झाला आहे  देश   परदेशात  संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी मोठमोठ्या  पदांवर आहेत तर काही नामवंत उद्योजक आहेत. हे केवळ  संजीवनी पॅटर्नमुळे शक्य झाले आहे
विध्यार्थ्यांना  मिळत असलेल्या नोकऱ्यांबाबत त संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे त्या तीनही   विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संस्थेचे डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी. ठाकुर ,ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके, विभाग प्रमुख डाॅ. एम.व्ही. नागरहल्ली उपस्थित होते.

……..
विध्यार्थ्याची  प्रतिक्रिया
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजमध्ये मला प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिकांसह सखोल ज्ञान मिळाले. आणि माझ्याकडून काॅलेजने रोबोटिक्सवर इंटर्नशिप  करून घेतली. या सर्व बाबींचा उपयोग मला मुलाखतीच्या वेळी झाला आणि माझी नोकरीसाठी निवड झाली. संजीवनी मुळे माझे व पालकांचे स्वप्न पुर्ण झाले.-श्रेयश  लोहकणे

Leave a Reply

You cannot copy content of this page