हिंदूमुस्लिम भाईचाराकार्यक्रम ही जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक- विवेक कोल्हे   

हिंदूमुस्लिम भाईचाराकार्यक्रम ही जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक- विवेक कोल्हे 

Hindu Muslim brotherhood program is a slap to those who create communal tension – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 24 April23 ,18.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : प्रभाग क्रमांक पाच मधील हिंदू मुस्लिम यांचा एकत्रितपणे केलेला कार्यक्रम हा भाईचारा घडवणारा असून हिंदू-मुस्लिमांना वेगळे करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना  ही चपराक असल्याचे प्रतिपादन  सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी रविवारी (23) रोजी सायंकाळी  “दावत ए शिरखुर्मा” या जुनी मामलेदार कचेरी नाभिक समाज कार्यालयातील कार्यक्रमात केले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, विविधता में एकता ही आपल्या देशाची खरी ओळख व ताकद आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघात सहा दशके सर्व धर्मांचा आदर करत सर्वांना एकत्रित करून जातीय सलोखा व संस्कृती जपण्याचे काम  केले. तेच काम संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कोल्हे परिवार सातत्याने करत आहे. यावर्षी सकाळी रमजान ईद दुपारी अक्षय तृतीया सायंकाळी जैन महामुनी यांचे दर्शन रात्री लक्ष्मीबाई यात्रेत कीर्तन महोत्सव अशा एकाच दिवसात कोपरगाव शहरात चार वेगवेगळे कार्यक्रम मला करता आले हीच खऱ्या अर्थाने कोपरगाव शहराची संस्कृती आहे ती जपण्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्रितपणे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. 
विवेक कोल्हे म्हणाले, निवडणूका येतात जातात मतासाठी वाद विवाद होता कामा नये शांतता अबाधित राहावी, सर्वांना बरोबर घेऊन मुख्य प्रवाहात  आणायचे आहे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे कोल्हे परिवाराने 
मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवून त्यांना 
नगरपालिका असेल पंचायत समिती असेल अनेक मुस्लिम बांधवांना सत्तेत प्रतिनिधित्व दिले.   30 वर्षानंतर कोल्हे कुटुंबीयांनी  अल्ताफ कुरेशी यांना उपनगराध्यक्ष करून मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे काम  केले. 
माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले नगरसेवक या नात्याने या प्रभागातील मुस्लिम बांधवांना कायम मदत व न्याय देण्याचे काम केले याच हेतूने आज दावत ए शिरखुर्मा कार्यक्रमाचे  निमित्ताने  हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही केलेला प्रयोग आजची  हिंदू मुस्लिम बांधवांची बरोबरीची संख्या पाहता  यशस्वी झाल्याचा आनंद वाटतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार माजी  उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी मानले. 
यावेळी मौलाना हाफीज बशीर, मौलाना निसार, मौलाना यासिन मिल्ली, मौलाना मोहसीन शहा, मौलाना अफजल पठाण, मौलाना हाफीज मुज्जफर, अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान  माजी नगराध्यक्ष  ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई  माजी नगरसेवक रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे कैलास जाधव, अतुल काले, दिलीप दारूणकर, बबलू  वाणी, जनार्धन कदम, विनोद राक्षे, अनिल जाधव, भाजप शहराध्यक्ष दत्ता काले, जितेंद्र रणशुर, संजय जगदाळे, विष्णुपंत गायकवाड, गोपीनाथ गायकवाड  विक्रमादित्य सातभाई, अक्षय निकुंभ, ज्ञानेश्वर गोसावी, प्रसाद आढाव, पप्पू पडियार रंजन जाधव सोमनाथ म्हस्के अहमद बेकरीवाले,  अल्ताफ कुरेशी, खलिक कुरेशी, लियाकत सय्यद, सलीम पठाण, शफिक सय्यद, फकीर मोहम्मद पहिलवान, रवींद्र रोहमारे, यश काले, कुणाल लोणारी, निखील जोशी, गोपीनाथ सोनवणे, शंकर बि-हाडे, सोमनाथ तापवले, सुजल चंदनशिव,  विक्रांत सोनवणे, चद्रकांत वाघमारे, अकिल सय्यद, शकील अत्तार, अमन मणियार, बबलू शेख, जब्बार मणियार, अब्बास मणियार, इलियास शेख, शिवाजी खांडेकर, सिध्दांत सोनवणे, संजय मंडलिक, राहुल आढाव.शरद कुलकर्णी मिलिन्द जोशी, हेमंत गोसावी,विलास गोसावी निशांत गोसावी, आभिषेक गायकवाड,गौरव लव्हुरिकर, शुभम भावसार,रोहित जाधव, ओम बागुल, मयुर खंडागळे,राहुल खडांगळे, भुषन मुलीक, ऊबेद आत्तार.सोनु आत्तार्, राजु आत्तार सनी खैरे.योगेश आमुतकर,पप्पु रत्नपारखी,मयुर लचुरे, जना पगारे, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच हिंदू, मुस्लिम व सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page