महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात महिला पोलीसांची संख्या वाढवा – संजय काळे
Increase the number of women police in Maharashtra in proportion to the population – Sanjay Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 24 April23 ,20.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जवळजवळ बारा कोटी आहे.महाराष्ट्रात माहिलांचीलोकसंख्या सहा कोटीच्या आसपास आहे अंगने. राज्यात मुद्देगारी जगतात अनेक महिलांचा देखील समावेश आहे. तेंव्हा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात महिला पोलीसांची संख्या वाढवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे
या पत्रात संजय काळे यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील गुन्हेगारी दराचा अभ्यास केल्यास महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे घरगुती हिंसाचे गुन्हे देखील वाढत आहे. परंतु समय पत्रालये माहिती अधिकारात प्राप्त माहिती धक्कादायक आहे राज्यात पोलीस अधिकारी संवर्गात एकूण 4086 अधिकाऱ्यांची मंजूर पदे असताना केवळ 328 महिला अधिकारी पोलीस सेवेत कार्यरत आहे. पोलीस अंमलदार (पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या संवर्गात 199903 मंजूर पदापैकी महिला केवळ 28698 आहेत. राज्यातील एकूण पोलीसांच्या मंजूर 221257 केवळ 30900 महिला पोलीस सेवेत आहे. याचाच अर्थ एकुण पदापैकी पोलीस विभागात महीला अधिकारी व कर्मचारी यांची संख्या नगण्य आहे.
राज्यात धार्मिक कार्यक्रम, राजकिय समा, पर्यटन, मोर्चे इत्यादी कार्यक्रमात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असलो, त्या साठी आहे. राज्यात संरक्षणात माहिला पोलीसांची संख्या तुटपुंजीच आहे. राज्य शासनाने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत झपाटयाने वाढवावी. त्यामुळे राज्यातील महिलांना शासकिय सेवेत प्रवेश करण्याचे मोठे मार्ग मोकळे होतील.महिला लोकसंख्येच्या तुलनेत, महिला अधिकारी व कर्मचारी यांची संख्या, तात्काळ वाढवावी. महिला पोलीस भरतीचे जिल्हा निहाय कॅम्प घ्यावेत, असे आवाहन संजय काळे यांनी केले आहे.
चौकट
राज्यांनी त्यांच्या पोलीस दलामध्ये महिलापोलिसांचे प्रमाण ३३ टक्क्यांपर्यंत वाढवावे अशी सूचना केंद्रीय गृह खात्याने केली आहे. पोलीस दलात रिकाम्या असलेल्या पदांपैकी काहींचे रुपांतर महिला पोलीस शिपाई व उपनिरीक्षक पदांमध्ये करावे असेही या खात्याने म्हटले आहे.
Post Views:
124