घर बांधण्यासाठी 25लाखांची मागणी; विवाहितेचा छळ
25 lakhs demand for house construction; Harassment of the married
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 24 April23 ,20.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील संजिवनी कारखाना कॉलीनी, शिंगणापुर, ता. कोपरगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा 25 लाखासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील संजिवनी कारखाना कॉलीनी, शिंगणापुर, ता. कोपरगाव येथील श्रध्दा परेश ढोणे (वय ३३ वर्षे,) यांचा विवाह परेश यशवंत ढोणे, यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरहून 25 लाख रूपये घर बांधण्यासाठी आणावे अशी मागणी पती परेश यशवंत ढोणे,याने केली. पैसे दिले नाही म्हणून तिचा १४ मे २०२२ ते ९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान वारंवार शारीरीक व मानसीक छळ केला. तसेच तिला उपाशी पोटी ठेवुन जिवे मारण्याची धमकी दिली.घटना गुजरात राज्यातील बडोदा येथे घडली.
विवाहितेने याप्रकरणी पती परेश यशवंत ढोणे, सासरे यशवंत मारुती ढोणे, सासु चंपाताई यसवंत ढोणे, व दिर जितेश यशवंत ढोणे, (चौघे रा. भावका भवानी मंदिराजवळ गायत्री मंदिर परिसर चित्तळ रोड, अमरेली, गुजरात, ता. जि. अमरेली) व ननंद हेतल अमित देवकाते (रा. बडोदा ता. जि. बडोदा. रा. गुजरात.) या पाच जणांविरुद्ध यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पुंड हे करीत आहेत.
Post Views:
150